मुक्तपीठ टीम
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम –किसान) योजनेचा दहावा हप्ता आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२:३० ला दूरदृश्य प्रणालीद्वारे हा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी १० कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना २० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे.
दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार!
- पीएम-किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने २००० रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक ६०००/- रुपये देण्यात येतात.
- लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते.
- या योजनेत १.६ लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात सुमारे ३५१ शेतकरी उत्पादन संस्थांना (एफपीओ)१४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान, शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
दहा कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना वीस हजार कोटी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान चा दहावा हप्ता 1 जानेवारीला जारी करणार
- दहा कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम होणार हस्तांतरित
- आतापर्यंत १.६ लाख कोटीपेक्षा अधिक सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना करण्यात आली हस्तांतरित करण्यात आली आहे.
- तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांची निरंतर कटीबद्धता आणि निर्धाराला अनुसरत हा हप्ता होणार जारी
- ३५१ शेतकरी उत्पादन संस्थाना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान करणार जारी, १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना होणार याचा लाभ