मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळकोकणातील आपला प्रभाव पुन्हा दाखवून दिलं आहे. शिवसेनेसह आघाडीच्या नेत्यांनी बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावूनही आघाडी पिछाडीवर गेली आहे. तर भाजपाच्या पॅनलने जबरदस्त विजय मिळवला आहे. आमदार नितेश राणे हे हल्ला प्रकरणात पोलीस शोधत असल्याने सिंधुदुर्गात नाहीत. तरीही त्यांच्या अनुपस्थितीत समर्थकांनी मिळवलेला विजय महत्वाचा मानला जात आहे.
सिंधुदुर्गात राणेंनी जिंकून दाखवलं!
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ पैकी १४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
- राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पॅनलने ११ जागा मिळवल्या आहेत.
- बँकेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच फटाके फोडणाऱ्या शिवसेनेला फक्त ८ जागा मिळाल्या आहेत.
- आघाडीच्या पॅनलेचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत.
- त्यांच्या मतदारसंघात भाजपाचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत.
- या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती.
- त्यामुळे ईश्वर चिठी काढण्यात आल्यावर देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
- त्याचवेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने ‘बँकेचा गड आला पण सिंग गेला’ अशी परिस्थिती झाली आहे.
- आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल
भाजपा विजयी उमेदवार
- प्रकाश बोडस
- दिलीप रावराणे
- मनीष दळवी
- महेश सारंग
- अतुल काळसेकर
- विठ्ठल देसाई
- बाबा परब
- समीर सावंत
- गजानन गावडे
महाविकास आघाडी विजय उमेदवार
- सुशांत नाईक
- गणपत देसाई
- विद्याप्रसाद बांदेकर