Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका वेळेवरच, निवडणूक आयोगाची घोषणा

December 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
UP election 2022 30-12-21

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वेळेवरच होणार आहेत. कोरोना संकट पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सहमतीने या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजधानी लखनौमध्ये आलेले मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सुशील चंद्र यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये योग्य वेळी निवडणुका होतील. सर्व राजकीय पक्षांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर निवडणुका घ्यायच्या आहेत. गुरुवारी लखनौमध्ये पत्रकार परिषदेत सुशील चंद्रा म्हणाले की, अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला येईल. ५ जानेवारीनंतर मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दीबाबत कोणतीही तक्रार आल्यास तीही तत्काळ निकाली काढण्यात येईल.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी मांडलेले मुद्दे

 

राजकीय पक्षांच्या सहमतीने वेळेवर निवडणुकीचा निर्णय

  • मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले की, आम्ही राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली.
  • निवडणुका वेळेवर व्हाव्यात, अशी राजकीय पक्षांची मागणी आहे.
  • २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते.
  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये ५९ टक्के मतदान झाले होते.
  • ज्या राज्यात राजकीय जागरुकता जास्त आहे, त्या राज्यात मतदानाची टक्केवारी कमी का, हा चिंतेचा विषय आहे.
  • आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

निवडणुकीसाठी खास सोयी-सुविधा!

  • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेणार!
  • राज्यभरातील मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल.
  • ८० वर्षांवरील लोक, दिव्यांग व्यक्ती आणि कोरोना बाधित लोक जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत, निवडणूक आयोग मतदानासाठी त्यांच्या दारात पोहोचेल.
  • सर्व मतदान केंद्रांवर VVPAT बसवण्यात येणार आहेत.
  • निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सुमारे एक लाख मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.

 

उत्तर प्रदेशात किती मतदार?

  • आतापर्यंत उत्तर प्रदेशात एकूण १५ कोटी मतदार आहेत.
  • अंतिम प्रसिद्धीनंतर मतदारांची खरी आकडेवारी समोर येईल.
  • शेवटच्या प्रसिद्धीनंतरही जर कोणाचे नाव आले नाही तर ते दावा करू शकतात.
  • आतापर्यंत ५२.८ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
  • यामध्ये २३.९२ लाख पुरुष तर २८.८६ लाख महिला मतदार आहेत.
  • १८-१९ वयोगटातील १९.८९ लाख मतदार आहेत.

Previous Post

‘अर्जून सचिन तेंडुलकर’ आता मुंबईच्या रणजी टीममध्ये!

Next Post

सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

Next Post
jijau te savitri

सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!