मुक्तपीठ टीम
Huawei चा सब-ब्रँड Honor आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. त्या मॉडेलला Honor MagicV या नावाने सादर करण्यात आले आहे. पुढील वर्षी २०२२ मध्ये हा फोन लॉन्च होऊ शकतो. Honor MagicV स्मार्टफोनची पहिली इमेज कंपनीने Weibo आणि Twitter हँडलवर पोस्ट केली आहे. मात्र, फोनच्या लॉन्च डेटबाबत कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही. २०१९ मध्ये, कंपनीचे CIO जॉर्ज झाओ यांनी Honor ब्रँड अंतर्गत फोल्डेबल स्मार्टफोन बनवायचे लक्ष्य जाहीर केले होते.
स्पेसिफिकेशन
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Honor MagicV स्मार्टफोनमध्ये ८.०३ इंचाचा फोल्डेबल इनर डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो ६.४५ इंचाच्या इनर डिस्प्लेसह येईल. जे सॅमसंग झेड फोल्ड उपकरणासारखे दिसेल. फोल्डेबल स्मार्टफोन्स सध्या खूप चर्चेत आहेत. techARC च्या अहवालानुसार, भारतात २०२१ मध्ये फोल्डेबल स्मार्टफोनच्या विक्रीत ६३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, २०२२ मध्ये हा आकडा ३ लाख युनिट्सच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सॅमसंगने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर, चीनी स्मार्टफोन ब्रँड OPPO ने अलीकडेच आपला फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N बाजारात लॉन्च केला आहे.