मुक्तपीठ टीम
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुझ्या पोटात तीन गाठी आहेत, त्यामुळे तुझे थोडेच आयुष्य राहिले आहे, जगायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, अशी घृणास्पद मागणी एका भोंदूबाबाने वारंवार महिलेकडे केली होती. दरम्यान या प्रकरणी वाकड पोलिसांनी सापळा रचत भामट्याला बीडवरून पकडले आहे. विलास बापूराव पवार उर्फ ‘महाराज’असं अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे.
नेमके प्रकरण काय?
- २१ डिसेंबर रोजी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
- महाराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विलास पवारने महिलेला फोन केला.
- कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तुझ्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले.
- महिलेला ‘तुझ्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्याचे आयुष्य थोडेसे राहिले आहे’ असे सांगून आरोपीने महिलेला वारंवार फोन करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
- ज्या माणसाच्या उजव्या तळहात आणि गुप्तांगावर तीळ आहे.
- त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले, तर तुम्हाला कोणीही काही करु शकणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लिल व्हिडीओ पाठवून त्यात उजव्या हात आणि गुप्तांगावरचे तीळ दाखवले.
- व्हिडीओ पाठवल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
- माझ्याशी शरीरसंबंध ठेवले, तर तुमचे सगळे कुटुंब सुखी राहील.
- तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा, असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करुन पीडीत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी असा रचला सापळा
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५४ (ड), २९२, ५००, ५०९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६७ (ए), नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या मदतीने २५ डिसेंबर रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा लावला.
आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.