मुक्तपीठ टीम
स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल आधारीत ऑफिसर्सच्या १२२६ पदांसाठी अर्ज मागवत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२१ आहे.
अर्ज कसा करावा
- एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या
- मुख्यपृष्ठावर दिसणार्या एसबीआय CBO भर्तीशी संबंधित लिंकवर जा
- विनंती केलेली माहिती भरा आणि नोंदणी करा
- आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून अर्ज भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी सबमिट करा
- तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या
अशी होईल उमेदवारांची निवड
- भारतीय स्टेट बँक द्वारे आयोजित सर्कल आधारित ऑफिसर (CBO) च्या भरतीमध्ये ३ फेऱ्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल.
- पहिली फेरी ऑनलाइन लेखी परीक्षा, दुसरी फेरी स्क्रीनिंग आणि तिसरी फेरी मुलाखत असेल.
या सर्व फेऱ्या पार पडल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.
रिक्त जागा तपशील
- CBO नियमित रिक्त जागा- ११००
- एसबीआय CBO अनुशेष रिक्त जागा- १२६
- एकूण रिक्त जागा- १२२६
राज्यनिहाय रिक्त जागा तपशील
- गुजरात- ३५४
- कर्नाटक – २७८
- तामिळनाडू- २७६
- मध्य प्रदेश- १६२
- राजस्थान- १०४
- छत्तीसगड- ५२
अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: