मुक्तपीठ टीम
राज्यातील मराठी उद्योजकांची आणखी एक कंपनी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध म्हणजेच लिस्टेड झाली आहे. सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडने शेअर बाजारात जोरदार पदार्पण केले. कंपनीचा शेअर ठरवलेल्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ५५ टक्के अधिक दराने सूचिबद्ध झाला.
आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर २७४ रुपयांचा दर निश्चित केला होता. प्रत्यक्षात बीएसईवर सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडचा शेअर ४२५ रुपयांवर लिस्टेड झाला. तेथे तो ५५.११ टक्के वाढीसह लिस्ट झाला. तर तो शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ४२१ रुपयांवर लिस्टेड झाला.
आयपीओमध्ये समभाग प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना आज पहिल्याच दिवशी मोठा फायदा झाला.
याचा राज्याला अभिमान असून मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढत असल्याबद्दल उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेड या कंपनीचा लिस्टिंग समारंभ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलत होते.
आयपीओमधील उज्ज्वल यशाबदल अभिनंदन करुन उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेडचा प्रवास हा अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. ही मराठी माणसाची कंपनी शेअर बाजारात लिस्टेड झाल्याचा राज्याला अभिमान आहे. फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील सक्रिय औषध घटक निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या या मराठी बांधवांच्या कंपनीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा विश्वास दाखवला याबद्दल आनंद आहे. राज्य शासन म्हणून आम्ही जगभरातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून गुंतवणूकीत वाढ व्हावी यासाठी विविध देशातील त्यांच्या भागीदारांशी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा मोठा गट असून त्यांच्या वाढीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारणे सहज झाल्याने या लहान उद्योजकांना त्यांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
सूचीबद्ध (Listing) कार्यक्रमांच्या माध्यमातून सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने उपलब्ध्ा करून दिलेल्या व्यासपीठाचा नक्कीच उपयोग होईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून सूक्ष्म, मध्यम उद्योगांना थेट भांडवली बाजारामध्ये प्रवेश करता येणार असून त्यांना भांडवलदार अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. परिणामी या उद्योगांवर गुंतवणूकदारांचाही विश्वास वाढत आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि मध्यम उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध्ा झाले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून उद्योगांच्या समृद्धीसाठी समर्थन दर्शविणाऱ्या मुंबई शेअर बाजारचेही (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) सुभाष देसाई यांनी यावेळी आभार मानले.
मराठी माणसाच्या कंपनीची दमदार कामगिरी!
- सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडने आज भांडवली बाजारात जोरदार पदार्पण केले.
- कंपनीचा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ५५ टक्के अधिक दराने लिस्टेड झाला.
- आयपीओमध्ये ज्यांना समभाग प्राप्त झालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांना आज लिस्टिंग झाल्याच्या पहिल्याच दिवशी मोठा फायदा झाला.
- आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर २७४ रुपयांचा दर निश्चित केला होता.
- कंपनीची प्राथमिक समभाग विक्री १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान खुली होती.
- बीएसईवर सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडचा शेअर ४२५ रुपयांवर लिस्टेड झाला.
- तो ५५.११ टक्के वाढीसह लिस्ट झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये तो ४२१ रुपयांवर लिस्टेड झाला.
त्यातून - आयपीओ ७२ पटीने सबस्क्राईब झाला होता.
- त्यानंतर ५४ च्या पटीत अर्ज करता येणार आहे.
पाहा व्हिडीओ: