मुक्तपीठ टीम
सोमवारी, २६ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने १९० जणांना मास्क न घातल्याबद्दल दंड केला. मध्य रेल्वेने सरकारी मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर मास्क परिधान न करणाऱ्या प्रवासी आणि व्यक्तींविरोधात मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार २६ डिसेंबरला मध्य रेल्वेचा सर्व स्थानकांवर तब्बल १९० व्यक्तींना मास्क न घातल्याबद्दल पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून ३५ हजारर १५० रुपये दंड वसूल करण्यात आला. डिसेंबर २०२१ मध्ये २६ पर्यंत एकूण एक हजार ७१० व्यक्तींनी मुखवटे न घातलेले आढळले आणि रु. २.६ लाख दंड वसूल करण्यात आला.
१७ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २१ या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या विशेष पथकांनी कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांनुसार मास्क/फेस कव्हर न घातलेल्या प्रवाशांची एकूण २६ हजार ७२५ प्रकरणे शोधून त्यांना दंड ठोठावला आणि ४३ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली.
मुंबई – ०२ हजार ६२८ प्रकरणे आणि ५.१३ लाख रुपये दंड वसूल
भुसावळ – १२,८०८ प्रकरणे आणि १५.०२ लाख रु दंड वसूल
नागपूर – ६,५९१ प्रकरणे आणि १३.१८ लाख रु दंड वसूल
सोलापूर विभाग – २,११८ प्रकरणे आणि रु. ४.५६ लाख रू दंड वसूल
पुणे – २५८० प्रकरणे आणि ६.०९ ₹ लाख दंड वसूल
मध्य रेल्वेने प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आणि कोरोनासाठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
तपासणी कर्मचार्यांच्या वागणुकीमुळे तक्रारींमध्ये घट ….
आपले कर्तव्य बजावत असताना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या वागणुकीमुळे तक्रारींमध्ये घट झाली आहे.