मक्तपीठ टीम
मध्य रेल्वे प्रशासनाने ११ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये पंँट्री कार पुन्हा सुरु करण्याचा आणि ही सेवा कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
प्रवाशांनी त्याचे स्वागत केले असून, आता धावत्या गाडीतील ‘खाऊगल्ली’त ताव मारता येईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटली. या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग आणि प्रवास करता येणार आहे आणि कोविड १९ संबंधित सर्व नियमांचे पालन करून या मेल/एक्स्प्रेसमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.
- १२१६५/१२१६६ एलटीटी ते गोरखपूर एक्सप्रेसमध्ये २३ डिसेंबरपासून आणि गोरखपूरहून २४ डिसेंबरपासून ही सेवा सुरु झाली.
- २२१७९/ २२१८० एलटीटी ते एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये २७ आणि २८ डिसेंबरपासून
- ११०३३/११०३४ पुणे – दर•ांगा एक्सप्रेसमध्ये २९ आणि दर•ांगाहून ३१ डिसेंबरपासून.
- २२१३१/२२१३२ पुणे – बनारस एक्सप्रेसमध्ये १० जानेवारी २२ पासून आणि बनारसहून ३ जानेवारी २२ पासून.,
- २२१५०/ २२१४९ पुणे – एनार्कुलम जंक्शन एक्सप्रेसमध्ये २ जानेवारी २२ पासून, आणि ३ जानेवारी २२ पासून एर्नाकुलमहून.
- ११०९७ / ११०९८ पुणे – एनार्कुलम जंक्शन एक्सप्रेसमध्ये ८ जानेवारी २२ पासूुन आणि १० जानेवारी २२ पासून एर्नाकुलम जंक्शनहून.
- ११०३७ /११०३८ पुणे-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये १३ जानेवारी २२ पासून आणि १५ जानेवारी २२ पासून १५.१.२०२२ गोरखपूरहून.
- १२१०७/ १२१०८ एलटीटी – लखनौ एक्सप्रेसमध्ये ५ जानेवारी २२ पासून आणि ६ जानेवारी २२ पासून लखनौहून.,
- १२१५३/१२१५४ एलटीटी – राणी कमलापती एक्सप्रेसमध्ये ३० डिसेंबर २१ पासून आणि ३१ डिसेंबर २१ पासून माजी राणी कमलापतीहून.
- १२१६१ /१२१६२ एलटीटी ते आग्रा कँट. लष्कर एक्सप्रेसमध्ये ७ जानेवारी २२ पासून आणि ८ जानेवारी २२ पासून आग्रा कॅन्टोनमेंटहून.
- १२१७३ /१२१७४ एलटीटी – प्रतापगड जंक्शन उद्योगनगरी एक्सप्रेसमध्ये २ जानेवारी २२ पासून आणि आणि प्रतापगड जंक्शनहून ४ जानेवारी २२ पासून या पँट्री कार सुरु होणार आहेत.