मुक्तपीठ टीम
अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनविणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्यटर चं स्वदेशी डिझाईन बनवेणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अनालिसीस, मिशन सॉफ्टवेअर च्या विकास आणि डिफेन्स अॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये १९८७ पासून योगदान देत आहेत.मराठमोळ्या अतुल दिनकर राणे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड ही कंपनी डीआरडीओच्या अंतर्गत येते. ब्रह्मोस हा भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असून या संस्थेने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकासासाठी आणि सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचे अग्रगण्य योगदान आणि तांत्रिक व्यवस्थापकीय नेतृत्व परिवर्तनकारक आहे.
अतुल राणेंचा DRDO कारकीर्द…
- १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले.
- त्यांच्या कारकीर्दीचा शुभारंभ डीआरडीओ प्रयोगशाळेतून झाला.
- त्यांनी भारतात विकसित होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
- त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-1 मिसाईलसाठी ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं.
- मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्युटर (OBC), हार्डवेअर इन लूप सिम्युलेशन स्टडीज, सिस्टीम अॅनालिसिस, मिशन सॉफ्टवेअरचा विकास आणि संरक्षण ऍप्लिकेशन्ससाठी एव्हियोनिक्स टेक्नॉलॉजीच्या स्वदेशी डिझाइन आणि विकासामध्ये राणे यांनी दिलेले योगदान हा नेहमीच प्रशंसेचा विषय आहे.
अतुल राणेंची महाराष्ट्रातील खानदेशचे सुपुत्र!
- अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत.
- रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांच मूळगाव आहे.
- अतुल राणे यांनी चेन्नईच्या Guindy Enginering College मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.
- त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं.
- १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले.