मुक्तपीठ टीम
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने अत्यंत अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओने बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी पल्ल्याच्या ‘प्रलय’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओच्या निवेदनानुसार, “भारताने ओडिशाच्या किनार्यावर ‘प्रलय’ या कमी पल्ल्याच्या, जमिनीपासून पृष्ठभागावर मारा करणार्या मार्गदर्शित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
Indigenously developed new surface-to-surface conventional ballistic missile ‘Pralay’ successfully flight tested from Dr APJ Abdul Kalam Island today. #NewTechnologies#AmritMahotsavhttps://t.co/kGgX3RMJ4k pic.twitter.com/cz1qm6OBdy
— DRDO (@DRDO_India) December 22, 2021
‘प्रलय’ची यशस्वी चाचणी!
- डीआरडीओने विकसित केलेले, हे घन-इंधन, युद्धभूमीवरील क्षेपणास्त्र भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या पृथ्वी संरक्षण वाहनावर आधारित आहे.
- एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सकाळी १०.३० वाजता सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मिशनची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली.
- प्रलय हे ३५०-५०० किमी कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ज्याची पेलोड क्षमता ५००-१००० किलो आहे.
Congratulations to @DRDO_India and associated teams for the maiden development flight trial. My compliments to them for the fast track development and successful launch of modern Surface-to-Surface Quasi Ballistic missile. It is a significant milestone achieved today. pic.twitter.com/woixwxdxjb
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 22, 2021
प्रलय क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
- ‘प्रलय’ क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करताना अगदी अचूकपणे लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.
- या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात ५०० किमीपर्यंत शत्रूवर मारा करण्याची ताकद आहे.
- डीआरडीओच्या म्हणण्यानुसार प्रलय क्षेपणास्त्र १००० किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे.
चीनच्या क्षेपणास्त्रांच्या मुकाबल्यास सक्षम!
- हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची चर्चा २०१५ पासून सुरू होती.
- डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात बॅलेस्टिक मिसाईल होलोकॉस्टचा उल्लेख केला होता.
- या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
ते जमिनीवरून उडवले जाऊ शकते. - प्रलय क्षेपणास्त्र इतर कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त मारक असल्याचे सांगितले जाते.
DRDOची उंचावती कामगिरी!
- DRDO गेल्या काही वर्षांपासून एकापेक्षा जास्त नवीन अत्याधुनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेत आहे.
- LACवर चीनसोबत सुरू असलेल्या कुरबुरीच्या काळातच डीआरडीओने या महिन्यात अग्नि-5 सह अनेक हेवी-ड्युटी बॅलिस्टिक ते क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे.
पाहा व्हिडीओ: