मुक्तपीठ टीम
जिजाऊच्या या वेगळ्या उपक्रमात जामघरच्या अंकिता मोकाशी आणि अन्य लेकींनी महिलांना आवश्यक वाटणारं आदर्श गाव मांडलंय…
आम्ही जे सादर करत आहोत ते आमच्या स्वप्नातलं गाव आहे. म्हणजे पुढे जाऊन एका गावामध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या आम्ही सादर करत आहोत. हे गावताडी गाव असं आम्ही नाव दिलं आहे. त्या गावात वाचनालय पाहिजे. व्यायाम शाळा, तसेच पोलीस अकॅडमी पाहिजे. कारण गावातली मुलं बारावीनंतर, काय करावं यासाठी पोलीस अकॅडमी आहे.
आमच्या गावात सीबीएसई शाळा आहे. अंगणवाडी आहे. मतीमंद असणाऱ्या मुलांसाठी एक वेगळी शाळा आहे. त्यानंतर समाज हॉल आहे. जेणेकरून काही कारणास्तव आपल्याला तिथे कार्यक्रम करता येतील. त्यानंतर उपकेंद्र आहे. महिला सक्षमिकरण, ज्या गावतल्या महिला असतात त्या एका जागी जाऊन काहीतरी करू शकतात. बाजारपेठ आहे, बसस्टॅंड आहे, पाण्याची टाकी आहे. ग्रामपंचायत आहे, शेती आहे आणि गाव तलाव आहे. त्यामध्ये आपण सर्व गावातील महिला मासे टाकू शकतो आणि त्यातून गावाला रोजगार मिळू शकतो. त्या उद्देशाने ते केलं गेलेलं आहे.
स्वच्छता अभियान, म्हणजे आठवड्यातून एक दिवस स्वच्छता अभियान राबवून आपलं गाव पण, स्वच्छ राहिल. यानंतर स्मशानभूमी आहे. कुठेही पावसाळ्यात बाहेर पडता येत नाही त्यावेळी प्रत्येक गावातच स्मशानभूमीची सोय असावी. यानंतर शेती आहे. त्याचबाजूला तबेलासुद्धा आहे. दुध व्यवसाय हा गावातच राहावा यासाठी तबेला आहे. असं हे आमच्या स्वप्नातलं गाव आहे.
पाहा व्हिडीओ: