मुक्तपीठ टीम
इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष याक्षणी भाजपला घाबरले असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात नाशिक भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ दिसून येईल असे मत भाजपचे नाशिक शहराध्यक्ष गिरीश पलवे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी (MVA) नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहें. मात्र, इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपाला घाबरले असल्याचे शहर पालवे यांनी सांगितले. या नाशिकचा विकास फक्त भाजपच करू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येणार असून, महापौर भाजपचाच असेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते बिथरले
खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बिथरले आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण कसं लढायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यांचे कार्यकर्ते रोज आमच्याकडे येत आहेत. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करतील, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. कारण महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी झाली असून सामान्य माणूसही त्यांच्या कारभारामुळे व्यथित झालेला आहे. अलिकडे नाना पटोले स्वबळावर लढणार म्हणत होते. आता आघाडीच्या चर्चा सुरु आहेत. भाजपनं चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचं पानिपत केल्याचं आपण पाहिलं आहे. आज भारतीय जनता पक्षाकडे शहरातील नागरिक अपेक्षेने पहात आहे. त्यामुळे पून्हा भाजपचा महापौर नाशिक महापालिकेमध्ये पाहायला मिळेल, असेही गिरीश पालवे म्हणाले.