Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते देशभरातील कलाकारांच्या ‘एक्झिम बाजार’ प्रदर्शनाचे उद्घाटन

"देशभरातील हस्तकला - शिल्पकला कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवावे" : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

December 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
Governor Koshyari inaugurates EXIM Bazaar in Mumbai

मुक्तपीठ टीम

प्राचीन भारत कला, शिल्पकला, मृद कला, वास्तुकला, काष्ठ कला, धातू कला,  वस्त्र कला अश्या ६४ कलांचे माहेरघर होते. दक्षिणेतील विविध मंदिरे तसेच अजिंठा – वेरूळसारख्या लेणी भारतीय कलाकारांनी साकारल्या होत्या. ब्रिटिशांनी स्वतःच्या व्यापाराला चालना देण्यासाठी देशातील विविध हस्तकला संपवल्या. या सर्व कलांचे पुनरुज्जीवन करून कारागिरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

भारतीय एक्झिम बँकेतर्फे मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे रविवारी देशाच्या 20 राज्यातील कलाकार, सृजनकार व शिल्पकारांच्या तीन दिवसांच्या ‘एक्झिम बाजार’ प्रदर्शन – विक्री मेळाव्याचे उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला  एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बांगरी, उपव्यवस्थापकीय संचालक एन रमेश व विविध राज्यातील स्टॉलधारक व निमंत्रित उपस्थित होते.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनातर्फे विविध कलांच्या पुनरुज्जीवनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या दिशेने एक्झिम बँक विशेषत्वाने प्रयत्न करीत आहे. देशभरातील कलाकारांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक्झिम बँकेने त्यांना आपल्या अधिपत्याखाली आणावे, त्यांचे कौशल्य वर्धन करावे तसेच त्यांच्या उत्पादनांना पॅकेजिंग, पणन व ब्रॅण्डिंगची जोड देऊन मूल्यवर्धित करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेट दिली व कलाकारांशी संवाद साधला.

एक्झिम बँकेतर्फे लुप्त होत चाललेल्या कलाकुसरीच्या संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु असून पाच वर्षांपासून एक्झिम बाजार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय संचालक हर्षा बांगरी यांनी सांगितले.  यावेळी उत्तराखंड येथील ‘हिमालय ट्री’  या संस्थेचे सुमन देव व राजस्थानच्या फड कलेचे संवर्धक नंदकिशोर शर्मा यांनी एक्झिम बाजारबाबत आपले अनुभव सांगितले.

भारतीय  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक्झिम बँकेतर्फे या आठव्या एक्झिम बाजार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विविध हस्तकलाकार, धातू कलाकार  व वस्त्र कलाकारांनी ७५ स्टॉल्स लावले आहेत. हे प्रदर्शन व विक्री २१ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन महाव्यवस्थापक धर्मेंद्र साचन यांनी केले तर आभार प्रदर्शन उपव्यवस्थापकीय संचालक एन रमेश यांनी केले.


Tags: Exim marketgovernor bhagat singh koshyarimumbaiएक्झिम बाजारमुंबईराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

पापाराझींमुळे नेहमी सेलिब्रिटी त्रस्त! पण अनुष्काने दिले धन्यवाद! असं का?

Next Post

नाना पटोलेंचं अमित शाहांना आव्हान: राज्यातच कशाला देशातच निवडणुका घ्या!

Next Post
nana patole challenged amit shah to take parliamentary election

नाना पटोलेंचं अमित शाहांना आव्हान: राज्यातच कशाला देशातच निवडणुका घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!