मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी एसआयटीच्या अहवालानंतर राहुल गांधींसह विरोधकांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकतेनं पुढे रेटली आहे, मात्र असं असताना केंद्र सरकार सध्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईच्या भूमिकेत दिसत नाही. टेनी यांच्या राजीनाम्याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रश्न विचारला असता, त्यांच्या उत्तरावरून केंद्र सरकार कारवाई करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आले. जोशी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत प्रश्न टाळताना दिसले. त्याचवेळी टेनी यांनी एका पत्रकाराची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ करत धमकावल्यानंतरही असं घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
टेनी यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सरकारचे उत्तर
- केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना प्रश्न विचारला असता, लखीमपूर खेरी प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
- संसद हे चर्चेचे ठिकाण आहे.
- विरोधकांच्या विधायक सूचना आम्हाला घ्यायच्या आहेत.
- आम्ही त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो पण त्यांनी नकार दिला.
- विरोधकांनी तपास पूर्ण होण्याची वाट पाहावी.
- सर्वोच्च न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करून आम्हाला संसदीय नियम मोडायचे नाहीत.
- मंत्र्यांच्या या उत्तरावरून सध्या केंद्र सरकार कारवाई करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते.
- त्याचवेळी, सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त आहे की मुलाच्या कृत्यासाठी वडिलांना शिक्षा होऊ शकत नाही, असे भाजपा नेतृत्वाचे मत आहे.
विरोधक संतप्त, तर टेनी काहीच घडले नाही अशा अविवार्भावात!
- शेतकरी हत्याकांडाच्या मुद्द्यावरून जिथे राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात संताप व्यक्त करणे सुरू ठेवले आहे.
- तर वादाच्या केंद्रस्थानी असलेले अजय टेनी मात्र गृहमंत्रालयातील आपले काम काहीच घडलेले नाही, अशा अविर्भावात हाताळताना दिसत आहे.
- तसेच अजय मिश्रा टेनी यांनी एका पत्रकाराची कॉलर पकडून शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही त्यांच्या वागण्यात फरक दिसत नाही.
- या सर्व घडामोडी पाहता त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय नेतृत्वाने टेनी यांना दिल्याचे दिसते.
राहुल गांधी यांनी लोकसभेत मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली
- लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी एसआयटीचा अहवाल आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणखी आक्रमक झाले आहेत.
- त्यांनी लोकसभेत सांगितले की, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा हे गुन्हेगार आहेत, त्यांनी शेतकऱ्यांची हत्या केली आहे.
- अशा मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.