मुक्तपीठ टीम
एनआयएमध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेत म्हणजेच एनआयएने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पंचकर्म वैद्य, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथालय सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण १८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पंचकर्म वैद्य- एमडी (आयुर्वेद) २) कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १२वी पास ३) ज्युनियर स्टेनोग्राफर (हिंदी)- विज्ञान विषय १२वी पास आणि डीएमएलटी ४) ग्रंथालय सहाय्यक- १०वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय विज्ञानातील प्रमाणपत्र ५) लोअर डिव्हिजन क्लर्क- १२वी पास ६) मल्टी टास्किंग स्टाफ- १०वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १) पंचकर्म वैद्य- ४० वर्ष २) कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ- २८ वर्ष ३) ज्युनियर स्टेनोग्राफर (हिंदी)- २८ वर्ष ४) ग्रंथालय सहाय्यक- ३० वर्ष ५) लोअर डिव्हिजन क्लर्क- २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ३५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २००० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी एनआयएच्या अधिकृत वेबसाइट nia.nic.in वरून माहिती मिळवू शकता.