मुक्तपीठ टीम
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलून राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित विजय मिळला आहे तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे. ऐन मतदानाच्या आधी काँग्रेसने भाजपामधून आलेले छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी रद्द केली आणि मंगेश देशमुखांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाकडे असलेल्या मतांबरोबरच आघाडीचीही अनेक मते चंद्रशेखर बावनकुळेंना मिळाली, अशी चर्चा आहे.
नागपूरमध्ये भाजपाचा विजय
- राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले होते.
- भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली होती.
- भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली.
- तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते.
- मात्र, मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.
- मतदान फुटू नये म्हणून भाजपाने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते.
- भाजपाला या निवडणुकीत विजय मिळाला आहे.
काँग्रेसने केली होती चमत्काराची भविष्यवाणी
- भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला.
- तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली.
- भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार देशमुख यांना १८६ आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटली असल्याचे समोर आले.
- काँग्रेसने सांगितला तसा चमत्कार झालाच, पण तो ऐनवेळी उमेदवार बदलाचा आणि आघाडीचीच मते फुटण्याचा झाला!