Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणूक : युती नसल्यानं अकोला शिवसेनेनं गमावलं! वंचित, अपक्षांनी कमळ फुलवलं!

दोन्ही उमेदवारांच्या 'अर्थ'पूर्ण प्रयत्नांमुळे नगरसेवकांसाठी आगामी निवडणुकीची सोय

December 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
akola election

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा या मतदारसंघात निकाल लागला आहे. शिवसेना- भाजपा युती तुटल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या या निवडणुकीत आघाडीतून लढणाऱ्या शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. ज्या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली होती, तिथंच पराभव पत्करावा लागला आहे. या जागेवर भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव केला आहे. वसंत खंडेलवाल यांना ४३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३३० मतं मिळाली आहेत. त्यात पुन्हा आघाडीची काही मते फुटल्याची चर्चा असल्यानं आघाडी शिवसेनेला फळलेलीच नाही.

 

‘अर्थ’पूर्ण प्रयत्नांमुळे

  • नगरसेवकांसाठी आगामी निवडणुकीची सोय झाली!
  • भाजपाचं कमळ फुलण्यात वंचित आघाडी, तसेच अपक्ष उमेदवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.
  • दोन्ही उमेदवारांकडून या निवडणुकीत विजयासाठी केल्या गेलेल्या ‘अर्थ’पूर्ण प्रयत्नांमुळे नगरसेवकांना आगामी निवडणुकीसाठी सोय झाल्याची चर्चा आहे.

 

अकोला वाशिम बुलडाण्यात कमळ फुललं

  • विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील २२ मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते.
  • तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
  • अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली.
  • यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे.
  • वसंत खंडेलवाल यांना ४४१ मते मिळाली आहेत त्यापैकी ३६ मते अवैध झाली आहत तर गोपिकिशन बजोरिया यांना ३३० मते मिळाली.
  • शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते.
  • गेल्या १८ वर्षापासून इथं युतीमधून शिवसेनेच्या उमदेवारांचा विजय झाला होता.
  • युती नसताना झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत वसंत खंडेलवाल यांनी गोपिकिशन बाजोरियांना अस्मान दाखवलं आहे.

 

गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

  • भाजपा आणि शिवसेना युती तुटल्यानंतर निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले होते.
  • वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात.
  • वसंत खंडेलवाल यांनी सातत्यानं अकोला वाशिम बुलडाणा या तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी कायम जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे.
  • त्यात पुन्हा आघाडीची काही मते फुटल्याची चर्चा असल्यानं आघाडी शिवसेनेला फळलेलीच नाही, अशी चर्चा करत शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत.

Tags: Akola-Buldhana-WashimBJPGopikishan BajoriaShivsenaVasant Khandewalअकोला-वाशिम-बुलढाणागोपिकिशन बाजोरियाभाजपावसंत खंडेलवालशिवसेना
Previous Post

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींवरील भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून तीव्र निषेध

Next Post

विधानपरिषद निवडणूक: ऐनवेळी उमेदवार बदलाच्या ‘हात’चलाखीमुळे भाजपानं नागपूर आरामात राखलं!

Next Post
mlc election bjp won, congress lost

विधानपरिषद निवडणूक: ऐनवेळी उमेदवार बदलाच्या 'हात'चलाखीमुळे भाजपानं नागपूर आरामात राखलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!