मुक्तपीठ टीम
सहा डिसेंबर रोजी सीडीएस बिपिन रावत, त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि १३ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर कसे कोसळले याचा तपास ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी करत आहे. दरम्यान, कोईम्बतूर पोलिसांनी बुधवारी हेलिकॉप्टर अपघात होण्यापूर्वी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.
अपघातापूर्वी टिपला होता हेलिकॉप्टरचा व्हिडीओ
- या प्रकरणाचा तपासाचा भाग म्हणून मोबाईल फोन ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
- फोनचा मालक कोईम्बतूरचा वेडिंग फोटोग्राफर आहे.
- हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी ८ डिसेंबरला तो मित्रांसह निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी भागात गेला होता.
- त्या दिवशी तो मित्रांसोबत घनदाट जंगलात का गेला होता, जो वन्य प्राण्यांच्या हालचालीमुळे प्रतिबंधित क्षेत्र आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
- दरम्यान पोलीस विभागाने चेन्नई हवामान विभागाकडून अपघाताच्या दिवशीचे तापमान आणि हवामानाशी संबंधित माहिती मागिवली आहे.
- या अपघाताबाबत पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शीचीही चौकशी करत आहेत.
- फुटेजमध्ये, IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर दाट धुक्यात अचानक गायब होते.
- हेलिकॉप्टर पडल्याचाही मोठा आवाज येत आहे.
- हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- या अपघाताच्या चौकशीसाठी आयएएफने त्रि-सेवा न्यायालयाची स्थापना केली आहे.
जनरल रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्याशिवाय ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान, स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंग (को-पायलट), ज्युनियर वॉरंट ऑफिसर (जेडब्ल्यूओ) राणा प्रताप दास, जेडब्ल्यू अरक्कल प्रदीप, लान्स ना. कुमार, लान्स नाईक बीएस तेजा, हवालदार सतपाल राय, नाईक गुरसेवक सिंग आणि नाईक जितेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले, त्यांना बंगळुरूच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.