मुक्तपीठ टीम
२१ वर्षांनंतर भारतातून विश्वसुंदरीची निवड झाली आहे. चंदीगड गर्ल हरनाज संधूला ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब मिळाला आहे. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं सत्तरावं वर्ष आहे. इस्रायलमध्ये झालेल्या महाअंतिम फेरीमध्ये संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ किताबाची मानकरी ठरली आहे. याधीही २००० मध्ये लारा दत्ताला तर १९९४मध्य सुष्मिता सेन यांना विश्वसुंदरी किताब मिळाले होते.
विश्वसुंदरी झाल्यानंतर हरनाजने मानले देव, पालक आणि मार्गदर्शकांचे आभार….
- किताब जिंकल्यानंतर हरनाजने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- ती म्हणाली की, मी देवाची ऋणी आहे.
- सोबतच माझ्या पालकांचंही मी आभार मानते.
- मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल द मिस इंडिया ऑर्गनायझेशनचंही मी आभार मानते.
- भारतासाठी २१ वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
कोण आहे हरनाज संधू?
- २१ वर्षीय हरनाजने नुकताच ‘मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया २०२१’ किताब आपल्या नावे केला.
- हरनाज चंदीगडची रहिवासी आहे.
- ती पेशाने मॉडेल आहे.
- तिने हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.
- तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे.
- तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण घेत आहे.
- तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.
भारतातील आतापर्यंतच्या विश्वसुंदरी
- सुष्मिता सेन- १९९४
- लारा दत्ता- २०००
- हरनाज संधू- २०२१