मुक्तपीठ टीम
म्हाडाच्या परीक्षेच्या पेपर फुटीचा वाद सुरु असतानाच आता २१नोव्हेंबरला झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) निकाल हा ‘लॉग इन’च्या गोपनीय पद्धतीने नको तर सार्वजनिक यादी पद्धतीने आणि गुणांच्या पुढे OMR शिटसह जाहीर करण्याची मागणी पुढे आली आहे. या परिक्षेसाठीही काही दलाल सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे सर्वांना कळेल अशी पारदर्शकता निकालात असावी, अशी मागणी करणारे निवेदन शिक्षकांनी युवाशाही संघटनेच्या माध्यमातून राज्य परीक्षा परिषदेचे दत्तात्रय जगताप यांना दिले आहे. युवाशाहीचे संस्थापक अध्यक्ष तुषार देशमुख आणि उपाध्यक्षा अश्विनी कडू यांनी या प्रकरणी लढण्याचा इशारा दिला आहे. अश्विनी कडू यांनी मुक्तपीठशी बोलताना तरुण शिक्षकांच्या भविष्याशी खेळ नको, त्यांच्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे सांगितले. तसेच आता जर दखल घेतली नाही आणि पुढे गोंधळ सुरुच राहिला तर २०२२च्या पवित्र पोर्टलच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अधिक भीषण परिणाम दिसतील, असेही त्या म्हणाल्या.
युवाशाही संघटनेने राज्य परीक्षा मंडळाला दिलेले निवेदन
प्रति,
मा दत्तात्रय जगताप
अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद पुणे
निवेदन : युवाशाही संघटना सविनय सादर.
विषय : दि. २१नोव्हेंबर ला झालेल्या TET परीक्षेचा निकाल हा उमेदवार लॉगिन न करता सार्वजनिक यादी पध्दतीने आणि गुणांच्या पुढे OMR शिट जाहीर करण्यात बाबत.
महोदय,
वरील उपरोक्त विषयान्वये आपणास नम्र विनंती करण्यात येतो की, दि २१ नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) झाली. या वेळी ही परीक्षा जवळपास ४ लाख उमेदवारांनी दिली.
आणि दरवेळी ही परीक्षेचा निकाल हा उमेदवार लॉगिनला होतो.
पण यावेळी स्पर्धा परीक्षा मध्ये उदा. आरोग्य (क) आणि (ड) संवर्गातील पदभरभरती, म्हाडा पदभरतीत राज्यात प्रचंड गोंधळ पहायला मिळला. यामुळे गुणवत्ता पुर्ण उमेदवारात चिंता वाढलिय. त्याच अनुषंगाने (TET) परिक्षेतही गैरव्यवहार झाल्याच्या चर्चाना बाहेर उधाण आलय. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात उद्याचे भविष्य घडवण्याकरिता येणारे शिक्षकच जर अपात्र असतील तर उद्याच्या मुलांचे भविष्य अंधकारमय आहे हेच अंतिम सत्य होय. त्यामुळे सदर परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे, ही बाब लक्षात घेऊन व राज्य परीक्षा परीक्षा परिषदेबाबत विश्वाअहर्ता उमेदवारांच्या मनात कायम रहावी याकरीता आणि परीक्षेत गोंधळ झालेला आहे, अशा अफवांना खोटं ठरवण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांन कडून आपणास नम्र विनंती आहे की, परीक्षेचा निकाल हा उमेदवार लॉगिन न करता सार्वजनिक यादी पध्दतीने आणि त्या गुणांच्या पुढें OMR शिट जाहीर करण्यात यावी ही नम्रपूर्वक विनंती!
आपला स्नेहाकिंत
युवाशाही संघटना महा.राज्य