मुक्तपीठ टीम
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल रविवारी पहाटे काही काळ हॅक झाले होते. हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या @narendramodi या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीटही केले. हॅकरनी बिटकॉइनबद्दल ते ट्वीट केले. भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. तसेच सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी केल्याचाही उल्लेख होता. त्यानंतर काहीवेळातच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचे अकाऊंट काही काळासाठी हॅक झाल्याची माहिती दिली. मात्र, पंतप्रधानांसारख्या देशातील महत्वाच्या व्यक्तीचं अकाऊंट हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे @narendramodi हे वैयक्तिक अधिकृत ट्विटर हँडल आहे.
- रविवारी, १२ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच ट्विटर हँडल हॅकर्सनी हॅक केले होते.
- त्यानंतर हॅकर्सनी भारताने बिटकॉईनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विट केले.
- तसेच भारत सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी करत आहे, असेही ट्वीट त्यांनी केले.
- ट्विट पहाटे २ वाजून ११ मिनिटांनी करण्यात आले होते, जे दोन मिनिटांत डिलीट करण्यात आले.
- मात्र ते डिलीट करताच २ वाजून १४ वाजता दुसरे ट्विट करण्यात आले.
- दोघांमध्ये बिटकॉइनबद्दलच मजकूर होता.
- नंतर तेही डिलीट करण्यात आले.
- यानंतर लगेच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे जाहीर केले.
- तसेच काही वेळातच ते ट्विटर हँडल पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे, असेही जाहीर करण्यात आले.
हॅकर्सनी काय केले होते ट्वीट?
- हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिटकॉईनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्वीट केले.
- सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी करत आहे. जे देशातील नागरिकांमध्ये वितरित केले जातील.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅक झालेल्या अकाऊंटवरून ट्विट झाल्यानंतर लोकांनी त्याचे स्क्रीन शॉट्स शेअर करण्यास सुरुवात केली.
- लोकांनी या ट्विटकडे दुर्लक्ष करावे, असे पीएमओने म्हटले आहे.
The Twitter handle of PM @narendramodi was very briefly compromised. The matter was escalated to Twitter and the account has been immediately secured.
In the brief period that the account was compromised, any Tweet shared must be ignored.
— PMO India (@PMOIndia) December 11, 2021
हॅकिंगमागे बिटकॉइन माफिया असल्याचा संशय!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्यानंतर देशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
- देशाचे पंतप्रधान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंटही हॅक होऊच कसे शकते? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
- हे काम बिटकॉइन माफियांचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
- “जेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे खाते सुरक्षित नसते. मग सर्वसामान्यांचे काय?” असे प्रश्नही विचारले गेले.