मुक्तपीठ टीम
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलारांनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर भाजपाने आक्रमक होत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातही तक्रार करत उट्टं काढण्याचा प्रयत्न केला.
वरळीतल्या सिलिंडर स्फोटानंतर महापौरांवर टीका करताना आमदार आशिष शेलारांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. किशोरी पेडणेकर यांनी याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात शेलारांविरोधात तक्रार दाखल केलीय. दरम्यान, जबाब नोंदवण्यासाठी आशिष शेलार मरिन ड्राईव्ह पोलीस पोलीस ठाण्यात गेले तेव्हा भाजपाने तिथे निदर्शने केली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शरद पवारांना खुर्ची देण्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना अपशब्द उच्चारले.
त्यानंतर भाजपानेही संजय राऊतांविरोधात तक्रार केली.
काय आहे प्रकरण?
- ३० नोव्हेंबर रोजी वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोट प्रकरणातील जखमी बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला.
- त्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला.
- या घटनेबाबत ४ डिसेंबर रोजी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुंबई मनपावर टीका केली होती.
- अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण मनपाच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात.
- पण तिथे सुरक्षित नाही.
- रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होत नाहीत.
- यावेळी महापौरांवर टीका करताना.
- महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? ७२ तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, ७२ तास कुठे निजला होता?
याच वाक्यावर आक्षेप घेत पेडणेकर यांनी शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. - तसेच गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे.
आशिष शेलारांचं मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र
- शेलार यांनीही पेडणेकरांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे.
- ‘मी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून वस्तुस्थितीमध्ये फेरफार केल्याचा निषेध व्यक्त करत आणि सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटा खटला भरण्याच्या दबावाला विरोध केला आहे’, असं ट्विट करत शेलार यांनी पत्राबाबत माहिती दिलीय.
शेलारांचे स्पष्टीकरण –
- सत्य समोर येईलच.
- आज सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर करून जरूर तुम्ही माझ्यावर खोट्या केसेस केल्या असतील.
- माझा सवाल अजून तोच आहे, नायर रुग्णालयामध्ये चार महिन्यांच ते बालक मृत्यूमुखी का पडलं? त्याच्या वडिलांचा दुर्देवी मुत्यू कसा झाला? त्याच्या आईचा मृत्यू का झाला?
- नायरमध्ये रुग्णांना योग्यलेळी सेवा-सुविधा का नाही मिळाली? आणि या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून, जे मी बोललो नाही ते आरोप करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहे.
- जे मी बोललो ते आजही फेसबुकवर त्यांच्या समोर आहे.
- आणि त्यामुळे जे गुन्हे दाखल होऊच शकत नाहीत त्याचा गुन्हा खोट्या पद्धतीने जरूर तुम्ही दाखल केला असाल, पण माझा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
- सरकारचा नाकरतेविरुद्धचा संघर्ष मी अजून कडवा करेन.
- कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून तुम्ही खोटे गुन्हे दाखल करतात का? नायर रुग्णालयामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या जनतेला न्याय द्या हे म्हटल्यावर खोटे गुन्हे दाखल करता का? ओबीसी समाजातील राजकिय आरक्षण टिकलचं पाहिजे म्हणून माझं निलंबन करता का? सावकरकरांच्या बाबतीत अपमान कोणी करू नये हा प्रश्न उपस्थित केला तर धमकवणाऱ्या नोटीस देता का? मी आणि माझे सहकार यात दबणार नाही, घाबरणार नाही, झुकणार नाही.
- हा जो अहंकार ठाकरे सरकारचा आहे, त्याविरुद्धचा संखर्ष अजून कडवा केला जाईल.
- न्यायालयामध्ये माझी बाजू मांडेनच पण समस्त जनतेचा घेतलेला वसा बिलकूल टाकणार नाही.
- आणि म्हणून आज या ठिकाणी खोट्या पद्धतीने केलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी केलेल्या सत्तेचा गैरवापराचा मी निषेध केला त्याचा मी निषेध करतो आणि संघर्षाची ग्वाही देतो.
महिला आयोगाने घेतली दखल
- आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे.
- राज्य महिला आयोगाने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
- हा अहवाल आल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून आशिष शेलार यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
- तर दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीकडूनही आशिष शेलार यांच्याविरुद्ध पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.