अपेक्षा सकपाळ
“आपली असते दिवाळी, आपली असते होळी, तेव्हा ते असतात सीमेवरती…” सणावाराला आपल्याला आवर्जून सैनिकांची आठवण येते. त्यांच्यामुळे आपले सण साजरे होतात, पण ते काही सण कुटुंबासह साजरे करु शकत नसतात. तसंच आपल्या देशाचं घर सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजलेल्या सीडीएस बिपिन रावत यांची घरांबद्दलची स्वप्न काही पूर्ण होऊ शकली नाहीत.
गावात घर बांधायचं स्वप्न अपूर्णच…
- बिपीन रावत यांना सैनी गावात घर बांधायचे होते.
- सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील सैनी गावात झाला.
- या गावात तीनच घरे आहेत.
- या तीनपैकी एका घरात बिपीन रावत यांचे काका भरतसिंह रावत राहतात.
- सुमारे ७० वर्षांचे भरत सिंह रावत यांना त्यांचे पुतणे बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांना पूर्ण धक्का बसला.
- बिपिन रावत यांचे काका भरत सिंह रावत यांनी सांगितले की, त्यांच्या पुतण्याला त्यांच्या मूळ गावी सैनी येथे घर बांधायचे होते.
- पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ते त्यांच्या मूळ गावी सैनी येथेही येणार होते.
गावच्या निसर्गात वेळ घालवायचा होता
- काका भरत सिंह रावत यांनी सांगितले की, त्यांचा पुतण्या एप्रिल २०१८ मध्ये शेवटच्या वेळी त्यांच्या मूळ गावी सैनीला गेले होते.
यावेळी त्यांनी कुळ देवाची पूजाही केली. - त्याच दिवशी वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधून गावातील निर्गात वेळ घालवायचा असल्याचे सांगितले होते.
- जानेवारीत निवृत्त होणार असून, त्यानंतर गावात घर बांधून राहीन, असे त्यांनी सांगितले होते.
नोएडातील वडिलोपार्जित घरात राहण्यासाठी खोली बांधली, पण राहू शकले नाहीत…
- नोएडातील वडिलोपार्जित घरात राहण्यासाठी चार महिन्यांपूर्वी एक खोली बांधण्यात आली, पण मधुलिका आणि सीडीएस बिपिन रावत यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
- लष्करप्रमुख होण्यापूर्वी त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल एलएस रावत येथे राहत होते, नंतर ते दिल्लीला गेले.
- तीन वर्षांपूर्वी २ मार्च २०१९ रोजी जनरल बिपिन रावत यांनी हुतात्मा स्मारकाच्या वार्षिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.
- त्यावेळी नोएडातील लोकांनी त्यांची भेट घेतली आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
- आता सेवानिवृत्त कर्नल डॉ. जेपी सिंह आणि त्यांची पत्नी सरोज नोएडाच्या या घरात राहतात.
- हे घर सहा वर्षांपासून बंद पडून असल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी ते येथे राहायला आले होते.
- मधुलिका रावत चार महिन्यांपूर्वी घरी आल्या होत्या.
- त्यांनी इथे रुम बनवून दिली होती आणि त्या आता इथे कधीतरी राहायला येतील असे सांगून गेल्या.
- अपघाताची बातमी समजताच नोएडातील लोकांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी सोशल मीडियावर याचा खुलासा करण्यास सुरुवात केली.
वडिलांनी घर बांधले होते
- शेजारी सेवानिवृत्त कर्नल एसके पटनी यांनी सांगितले की, बिपिन यांनी दोन दिवसांपूर्वीच आर्मी सर्व्हिस कॉर्प्स डेच्या ऑफिसर्स बॅज समारंभात रावत यांची भेट घेतली होती.
- तो या घरी येयाचे.
- त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल एलएस रावत येथे राहत होते. त्यापूर्वी त्यांची मुलेही येथे राहत होती.
- नंतर सगळे दिल्लीत राहू लागले.