मुक्तपीठ टीम
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १२ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेच्या आवारात निदर्शन केली जात आहेत. या खासदारांना राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून विरोधकांनी संजय राऊतांना चांगला टोला लगावला आहे. यावरून संजय राऊतांनीही पलटवार करत भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.
अतुल भातखळकरांचा टोला
- नवी दिल्लीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
- या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती.
- ‘धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा.
- आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू.
- पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय.
धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते @PawarSpeaks गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच. pic.twitter.com/dnePHj6B5e
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 8, 2021
नितेश राणेंची टीका
- संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही.
- कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही.
- कधी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठई धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा.
- जेणेकरुन यूपीएमध्ये जाण्याचं कष्टही वाचेल.
- तसेच निलेश राणे यांनी ट्विट करत ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला लगावला आहे.
पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख. pic.twitter.com/NNg2wzUotz
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 8, 2021
संजय राऊतांचा पलटवार
- शरद पवार यांची प्रकृती त्यांना होणारा त्रास जास्त आहे.
- आपण बसतो तसं त्यांना खाली बसता येत नाही.
- म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली.
- लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंह यादव, मुरली मनोहर जोशी असे नेते जरी असते तरी मी खुर्ची आणून दिली असती.
- हे राजकीय विरोधक जरी असले तरी ती पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत.
- ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोरही उभं केलं नाही. त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नये, असं राऊत म्हणाले.
- बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत.
- आणि त्यांनी मला हा संस्कार दिला आहे.
- मोठ्यांचा आदर करावा.
- प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही.
- हे या *** लोकांना कळत नाही.
- ही *** बंद करा.
- अशानं तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही.
- हा तुमच्या डोक्यातील कचरा आहे.
- हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील.
- हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतोय.
- मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्यानं जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याच अधिकार नाही.
- वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.