मुक्तपीठ टीम
तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये लष्कराचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १४ जण होते. आतापर्यंत १४ पैकी १३ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. मृतांची अधिकृत नावे ही अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही. हा हेलिकॉप्टर अपघात कसा, कुठे झाला? जाणून घ्या…
हेलिकॉप्टर कुठे कोसळले?
- सुलूरहून वेलिंग्टनला जात असताना कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले.
- कुन्नूरपासून निलगिरी पर्वत आणि चहाचे मळे सुरू होतात.
- लष्कराचे हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले आहे.
- सीडीएस रावत हे उटीजवळील वेलिंग्टन डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी जात होते.
वेलिंग्टन डिफेन्स कॉलेजच्या वाटेवर झाला अपघात…
- CDS बिपिन रावत यांचा कार्यक्रम डिफेन्स स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन, उटी येथे आयोजित करण्यात आला होता.
- तिथे सीडीएस जनरल रावत व्याख्यान देणार होते.
- वेलिंग्टन येथे सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे.
- सीडीएस आणि त्यांची पत्नी हेलिकॉप्टरमध्ये ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांसह होते जे सीडीएस टीममधील कर्मचारी अधिकारी होते.
तसेच दोन पायलटही एकत्र होते.
अपघात कसा झाला? कारण काय असू शकते
- संरक्षण तज्ज्ञांच्या मते, Mi-17V5 हेलिकॉप्टर हे VVIP ट्विन इंजिन हेलिकॉप्टर आहे.
- हे हेलिकॉप्टर सियाचीन ते ईशान्येकडील आणि देशभरातील दुर्गम भागात वापरले जाते.
- अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
- या दुर्घटनेमागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.
- त्याचबरोबर अनपेक्षितपणे उद्भवलेली तांत्रिक समस्या हेही एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरवरील पायलट वर्ग हा कमालीचा अनुभवी आणि संयमी असाच असतो, त्यामुळे मानवी चुकीची शक्यता अगदीच कमी असते.