मुक्तपीठ टीम
सीमा रस्ते संघटनेत म्हणजेच बीआरओमध्ये मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) या पदासाठी ३३ जागा, मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) या पदासाठी १२ जागा, व्हेईकल मेकॅनिक या पदासाठी २९३ जागा, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट या पदासाठी १६ जागा अशा एकूण ३५४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (पेंटर)
- पद क्र.२- १०वी उत्तीर्ण
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) मोटर व्हेईकल मेकॅनिक/ डिझेल/ हीट इंजिन प्रमाणपत्र
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ आणि पद क्र. २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष तर, पद क्र. ३ आणि ४ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कमांडंट, GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- ४११०१५
अधिक माहितीसाठी बीआरओच्या अधिकृत वेबसाइट http://www.bro.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.