मुक्तपीठ टीम
BoAt हा आपला भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. इमॅजिन मार्केटिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ब्रँडनेमखाली इयरफोन, हेडफोन स्टिरिओ, ट्रॅव्हल चार्जर्स आणि प्रीमियम रग्ड केबल्स बनवते. बोट प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण कल्पनांसह नविन डिवाइस लाँच केले जातात. यावेळी बोटने भारतात Rockerz 330 pro हा नेकबँड लाँच केला आहे. हा नेकबँड ऑडिओ डिवाइस एकदा चार्ज केल्यानंतर ६० तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो. लोकप्रिय गायक, रॅपर आणि गीतकार एपी धिल्लन यांच्याहस्ते हा नेकबँड लॉन्च करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी BoAt ने Rockers 205 Pro नावाचा आणखी एक नेकबँड भारतात लॉन्च केला होता. जो ९९९ रुपयात लॉन्च करण्यात आला होता. boAt प्रत्येक किंमतीचे डिवाइस ऑफर करते.
boAT Rockerz 330 Pro ची किंमत
- boAt Rockerz 330 Pro १,४९९ च्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
- नेकबँड हा काळा, निळा, पिवळा, जांभळा आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये ऑफर करण्यत आला आहे.
- नेकबँड अॅमेझॉन इंडिया वेबसाइट व अधिकृत boAt वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.
- प्रास्ताविक ऑफर अंतर्गत, प्रत्येक ६०व्या ग्राहकाला १००टक्के कॅशबॅक मिळेल आणि टॉप ६० ग्राहकाला AP Dhillon मर्चेंडाईज मिळेल.
boAT Rockerz 330 Pro फिचर्स
- boAT Rockerz 330 Pro एकादा चार्ज केल्यावर ६० तास चालते
- boAT Rockerz 330 फक्त ३० तासांची बॅटरी लाइफ देते. -फक्त १० मिनिटांच्या चार्जमध्ये २० तासांच्या प्लेबॅकचा आनंद घेऊ शकता.
- इअरबड्स 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि ENx तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
- डिव्हाइस ब्लूटूथ V5.2 च्या समर्थनासह देखील येते, जे जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते.
- BoAT Rockerz 330 Pro ला पाणी आणि घामाच्या प्रतिकारासाठी IPX5 रेट केले आहे.
- हे खूप हलके आहे आणि मैग्नेटिक इयरबड्ससह उपलब्ध आहे.