Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी काम थांबच थांब! फडणवीसांच्या सत्तेत भूमीपूजन, ठाकरेंच्या सत्तेत मनोरा आमदार निवासाचे काम सुरु होणार!

December 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
devendra fadanvis (2)

मुक्तपीठ टीम

सरकारी काम सहा महिने थांब, असं आपल्याकडे म्हणतात. पण राज्याचा कारभारात महत्वाचे स्थान असणाऱ्या आमदारांच्या आमदार निवासाच्या बांधकामासाठी तर ‘थांबच थांब’ सुरु आहे. सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमिपूजन झालेल्या मनोरा आमदार निवासाच्या नव्या वास्तूच्या बांधकामाला आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना सुरुवात होणार आहे.

 

९०० कोटींचा प्रकल्प!

मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. तीन कंपन्यांनी पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुढच्या वर्षी या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.

 

उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर अंतिम कंत्राट दिलं जाणार

  • मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना नव्या मनोरा आमदार निवासाचे भूमीपूजन २०१९ साली जुलै महिन्यात करण्यात आले.
  • मात्र त्यानंतर या कामाचे पुढे काहीच झाले नाही.
  • आमदारांना मुंबईत राहण्यासाठी सरकारी खर्च मिळत असल्याने त्यांनाही कार्यकर्त्यांना उपयोगी पडणाऱ्या या सुविधेची आठवण राहिली नसावी.
  • कोरोना संकटात तर या कामाचा कुणी पाठपुरावाही क्वचितच केला असावा.
  • त्यामुळे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही या नव्या मनोरा आमदार निवसाचे काम अद्याप सुरु झालेले नाही.
  • या कामासाठी टाटा , शापूरजी पालनजी आणि एल अँड टी या कंपन्यांनी निविदा भरलेल्या आहेत.
  • उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर अंतिम कंत्राटदार ठरवला जाईल.
  • त्यानंतर मनोरा आमदार निवासाच्या प्रस्तावित इमारतीचे बांधकाम सुरु होईल.

 

मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते #मनोरा आमदार निवास इमारतीचे भूमिपूजन. सभापती रामराजे निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील विनोद तावडे, महादेव जानकर, सुरेश खाडे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आदी उपस्थित pic.twitter.com/L6mi53u1nQ

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2019

नवा मनोरा आमदार निवास…आमदारांसाठी भव्य अशी सर्वसुविधायुक्त वास्तू!

  • मनोरा या नव्या आमदार निवासात तब्बल ८०० खोल्या असणार आहेत.
  • ही एक ३४ मजली इमारत असेल.
  • नव्या इमारतीचे एकूण बांधकाम ७ लाख ७२ हजार चौरस फुटांचे असेल.
  • नव्या इमारतीत एक मोठे सभागृहही असेल.
  • सभागृहाची आसन क्षमता ही २४० असेल.
  • ही इमारत सर्व सोयीसुविधांनी युक्त असून याठिकाणी वाहनतळ, दवाखाना, दुकाने, भोजन कक्ष यांची व्यवस्था असेल.
  • या नव्या इमारतीत चित्रपटगृह, वाचनालयदेखील असेल.

Tags: cm uddhav thackeraydevendra fadanvismanora mla residence redevelopment projectmumbaiदेवेंद्र फडणवीसमनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्पमुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे
Previous Post

“बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘१०९८’चा प्रभावी वापर व्हावा!”

Next Post

१९७१ च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय – सुनील केदार

Next Post
वीर सैनिक

१९७१ च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय - सुनील केदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!