Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साने गुरुजी यांच्या कार्यावर आधारीत कला -साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

December 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अंतर्गत

मुक्तपीठ टीम

साने गुरुजी यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कार्यावर आधारीत कला- साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अंतर्गत येणाऱ्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या प्रकल्पांसंदर्भातील बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संजय मंगो, कार्याध्यक्ष अमेय तिरोडकर, साने गुरुजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा,  साने गुरुजी आंतरभारती कलाभवनचे अध्यक्ष युवराज मोहिते, आदी उपस्थित होते.

            

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अंतर्गत आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग या केंद्राबरोबर संयुक्त विद्यामाने साने गुरुजी यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कला- साहित्य संवाद आयोजनासाठी प्रयत्न करेल. दरवर्षी ट्रस्टमार्फत २४ डिसेंबर या साने गुरुजी यांच्या जन्मदिवसापासून ते ३१ डिसेंबर या कालावधीत कला- संवाद कसा आयोजित करण्यात येईल याबाबतचा प्रस्ताव आंतररभारती अनुवाद सुविधा केंद्रामार्फत पाठविण्यात यावा, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

            

मराठीतील उत्तम साहित्याचे अनुवाद जगभरात पोहोचवण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी हा प्रयत्न असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग मदत करेल. याशिवाय लेखकांना लेखनासाठी निवासी फेलोशिप संदर्भातील प्रस्तावाबाबतही राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.


Tags: amit deshmukhSane Gurujiअमित देशमुखकला -साहित्य संवादसाने गुरुजी
Previous Post

सावधान! जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो सांगून चिमुरड्या मुलीला घेऊन पळाली!

Next Post

निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार १ डिसेंबरपासून

Next Post
Vijay Vadettiwar

निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार १ डिसेंबरपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!