मुक्तपीठ टीम
संभाव्य कोरोना परिस्थिती लक्षात घेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपाक्षेत्रात उद्यापासून कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे तर मनपाक्षेत्रात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सुद्धा कोरोना प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी खबरदरीच्या सर्व उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. यामध्ये मंगळवारपासून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वानी मास्क वापरणे हे बंधनकारक आहे शिवाय गर्दीमध्ये जाणे टाळले पाहिजे. तसेच सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. नागरिकांनी खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कापड लावणे आवश्यक आहे तसेच व्यापारी आस्थापनानी सुद्धा आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या तोंडावर मास्क असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याच बरोबर ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तातडीने घ्यावा. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे.
कोरोना प्रसार रोखण्यासाठी राज्य केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे सर्वानी पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. मनपाक्षेत्रात कोरोना शिरकाव होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व उपाय अवलंबले जात आहे. मंगळवारपासून मनपाक्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे तसेचसार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणीही विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. आपल्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रवेश होऊ नये यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनीही संभाव्य धोका लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे तसेच कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.