मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दलात कमिशंड ऑफिसरसाठी एएफसीएटी एंट्री या पदासाठी फ्लाइंग, ग्राउंड ड्युटी (टेक्निकल), ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) ब्रांच आहे तर, एनसीसी स्पेशल एंट्री या पदासाठी प्लाइंग ब्रांच आहे. या पदांसाठी एकूण ३१७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार, ३० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार
- एएफसीएटी एंट्री फ्लाइंग- ६०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण व ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ६०% गुणांसह बीई/ बी.टेक
- एएफसीएटी एंट्री ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)- ५०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण २) ६०% गुणांसह बीई/ बी.टेक
- एएफसीएटी एंट्री (नॉन टेक्निकल)- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ बी.कॉम/ ६०% गुणांसह बीबीए/ बीएमएस/ बीबीएस/ सीए/ सीएमए/ सीएस/ सीएफए किंवा बी.एससी (फायनान्स)
- एनसीसी स्पेशल एंट्री फ्लाइंग- एनसीसी एअर विंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय फ्लाइंग ब्रांचसाठी १८ ते २३ वर्षे तर, ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/ टेक्निकल) साठी २५ ते १८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून एएफसीएटी एंट्री या पदासाठी २५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एनसीसी स्पेशल एंट्री या पदासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.