मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोना मंदवला असतानाच संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. यामुळे पुन्हा एकदा तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. भारत सरकार यामुळे अलर्ट झाले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहून सावध केले आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचाणी
- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
- या पत्रानुसार, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संक्रमित प्रवाशांच्या नमुन्यांची जीनोम चाचणी करावी
- राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संक्रमित आढळलेल्या प्रवाशांचे नमुने ताबडतोब नियुक्त जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातील याची खात्री करण्यास सांगितले.
- नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) च्या हवाल्याने पत्रात म्हटले आहे की, बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचे नवीन B.1.1529 प्रकार आढळून आले आहेत.
प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवा
- भूषण यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन झाले आहे.
- अलीकडेच व्हिसा निर्बंध शिथिल केल्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करणे आवश्यक आहे.
- एवढेच नाही तर या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांवरही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्ष ठेवले पाहिजे.
आयजीएसएलएसकडे नमुने त्वरित पाठवा!
- सरकारने राज्यांना संक्रमित प्रवाशांचे नमुने त्वरित आयजीएसएलएसकडे पाठवण्यास सांगितले आहे.
- जीनोमिक चाचणी अहवाल लवकर यावेत याची खात्री करण्यासाठी, राज्याने संबंधित आयजीएसएलएससोबत पाळत ठेवणार्या
- अधिकार्यांमार्फत समन्वय साधावा जेणेकरुन प्रकार आढळून आल्यानंतर आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना करता येतील.
परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करा
- दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडला असल्याची माहिती आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) ने गुरुवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या नवीन कोरोना प्रकाराचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी वैज्ञानिक काम करत आहेत.
- एनआयसीडीने सांगितले की जीनोमिक सिक्वेन्सिंगनंतर बी 1.1.529 प्रकारातील २२ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.