मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने भारतात खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली घालण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी भारत सरकार लवकरच कायदा आणणार आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने हे विधेयक आणण्याच्या घोषणेनंतर क्रिप्टो मार्केटमध्ये खळबळ उडाली असून अचानक क्रिप्टोकरन्सी मार्केट कोसळले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. संसदेच्या या अधिवेशनातच खाजगी क्रिप्टोकरन्सी विधेयक आणले जाईल. सभागृहाच्या कामकाजावरील अधिकृत दस्तऐवजात अशी माहिती देण्यात आली आहे की, आगामी हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल, २०२१ संसदेत सादर केले जाणार आहे.
रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल चलन!
- भारतात खासगी क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
- आरबीआय लवकरच स्वतःचे डिजिटल चलन जारी करणार आहे.
- डिजिटल चलन खासगी हातात ठेवणे गुंतवणूकदारांसाठी घातक ठरू शकते, त्यामुळे सरकारला क्रिप्टोकरन्सीवर आरबीआयचे नियंत्रण हवे आहे.
- यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नेही असुरक्षित किरकोळ गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या अनियंत्रित वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती.
क्रिप्टोकरन्सी विधेयकामुळे काय घडणार?
- क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी सरकार आणत असलेल्या विधेयकाचे नाव आहे क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलनाचे नियमन विधेयक, २०२१.
- या विधेयकाद्वारे केंद्र सरकार अधिकृत क्रिप्टोकरन्सी जारी करू शकणार आहे.
- या विधेयकाद्वारे सर्व खासगी क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्यात येणार आहे.
क्रिप्टोकरन्सीचा इतिहास
- क्रिप्टोकरन्सीची आता अधिक चर्चा सुरु आहे.
- जगात नव्वदीच्या दशकातच याबद्दल विचार करायला सुरुवात झाली.
- नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीस, जेव्हा तांत्रिक क्रांती सुरू झाली, तेव्हा फ्लुझ, बीन्झ आणि डिजिकेश यांनी डिजिटल चलनाच्या रूपात पाय पसरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश आले नाही.
- वास्तविक सुरुवातीला लोकांचा या डिजिटल चलनावर विश्वास बसत नव्हता.
- यानंतर, २००९मध्ये सातोशी नाकामोटो या टोपणनावाने काम करणाऱ्या एका अज्ञाताने एक सॉफ्टवेअर विकसित केले.
- त्यांनी सर्वप्रथम बिटकॉइनची कल्पना सर्वांसमोर ठेवली.
- ब्लॉकचेन पद्धतीने काम करणाऱ्या बीट कॉईनच्या माध्यमातून जगभरात क्रिप्टोकरन्सीचा प्रसार झाला. विकासही.
- उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीत झपाट्याने वाढ झाली आहे.
- बिटकॉइन व्यतिरिक्त, क्रिप्टोकरन्सीमध्ये अनेक खासगी डिजिटल चलने चलनात आहेत.
- पण आजवर केवळ एका देशाने साल्वाडोरने क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिली आहे.