रॉबिनसन डेव्हिड/सांगली
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. तर मात्र निवडणूक बिनविरोध न केल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला असून भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. आमदार विक्रम सावंत हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत. महाविकास आघाडीच्या पॅनलचे १७ उमेदवार निवडून आले असून भाजप प्रणित पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
त्यंत चुरशीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदान झालं होतं. ८५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २१ जागांपैकी १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १४ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या तीन जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. तर भाजपाला ४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्चस्व मिळवला आहे. लक्षवेधी ठरलेल्या लढती मध्ये भाजपाचे सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, संग्रमसिंह देशमुख आणि प्रकाश जमदाडे हे विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा याठिकाणी करेक्ट कार्यक्रम करण्यात आल्याची, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
विजयी उमेदवार
१)विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट
२)आ.मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट
३)महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)
४)जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट
५)अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट
६)दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट
७)आ.मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)
८)बी एस पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट
९)प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट
१०)तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट
११)आ.अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)
१२)अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट
१३)वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट
१४)मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट
१५)बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट
१६)राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती
१७)सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट
१८)पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था
१९)राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था
२०)संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट
२१)सत्यजित देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट