मुक्तपीठ टीम
आपल्या जमापुंजीतून पुढील वाटचालीसाठी बचत करणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. बचत आपल्याला भविष्यात अनपेक्षित खर्चाचा सामना करण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमची बचत दुप्पट करायची असेल आणि कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या गुंतवणूक योजनेत, ठेवीदाराला त्याच्या ठेवीवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षिततेचा लाभ मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही या योजनेत १० वर्षे आणि ४ महिने म्हणजेच १२४ महिने गुंतवणूक केली तर तुमची रक्कम दुप्पट होईल.
व्याज दराविषयीची सविस्तर माहिती
- भारतीय पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, तुमचे पैसे जमा केल्यावर तुम्हाला सध्या वार्षिक ६.९ टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.
- या व्याज दरात दरवर्षी वाढ होते.
गुंतवणूक रक्कम
- भारतीय पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवलेल्या रकमेसाठी प्रमाणपत्र जारी केले जाते.
- कोणतीही व्यक्ती या योजनेत किमान १ हजार रूपये गुंतवून गुंतवणूक करू शकते.
- जर तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला यासाठी पॅन कार्ड द्यावे लागेल.
- या पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणुकीवरील व्याज वित्त मंत्रालयाद्वारे ठरवले जाते आणि ते बाजारातील जोखमेशी संबंधित नाही.
कोण-कोण या योजनेत सहभागी होऊ शकते
- पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही भारतीय व्यक्ती जो प्रौढ आहे, त्याचे खाते उघडू शकते.
- योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
- या अंतर्गत, अल्पवयीनांच्या नावावर केव्हीपी प्रमाणपत्रे देखील खरेदी करता येतील.
- एनआरआय या योजनेसाठी पात्र नाही.
भारतीय पोस्टच्या किसान विकास पत्र योजनेच्या नावावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी असल्याचे स्पष्ट होते. मात्र या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. या योजनेत, एखाद्या व्यक्तीला केव्हीपी प्रमाणपत्र खरेदी करण्यासाठी किमान १ हजार गुंतवावे लागतात. जर तुम्ही या योजनेत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल.