मुक्तपीठ टीम
भारत आणि चीनमध्ये सीमेवर काहीसा कायमच तणाव असतो. चिनी कुरापतखोरीविरोधात भारतीयस सैन्यही आता ताकदीनं उभे ठाकलंय. त्यातच आता भारतीय सेनेनं निसर्गाच्या प्रतुकुलतेशी झुंजत सीमाभागात एक वेगळं धाडस केलंय. भारतीय सैन्याने लडाखमधील हनले घाटात ७६ फुट उंच लांब राष्ट्रध्वज उभारला आहे. हनले घाट समुद्र पातळी पासुन १५००० फुट उंची वर आहे. भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्यूरी कोरच्या टीमने चीन सीमेलगत असणाऱ्या हनले घाटात तिरंगा फडकवला. याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
ट्विटर वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये सैनिकांचे २ गट तिरंग्याला सलामी देताना दिसत आहेत. भारतीय सैन्य आणि फ्लॅग फाऊंडेशनकडून हा ध्वज उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा तिरंगा फडकवल्याचे भारतीय सैन्याने सांगितले आहे.
15 हज़ार फीट की ऊंचाई पर,
भारत का परचम!!
-11डिग्री सेल्सियस तापमान में,
भारतीय सेना की @firefurycorps ने लद्दाख की हानले घाटी में फहराया 76 फीट लंबा राष्ट्रीय ध्वज!!
#IA और @FFOIndia ने किया है इसे तैयार,
देश को आप पर गर्व है!#AzadiKaAmritMahotsav@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/vzrqa99GEs— B.L Verma (@blvermaup) November 22, 2021
भारतीय सैन्याचे चीनला जरब बसवणारे शक्तीप्रदर्शन
- भारतीय सैन्याच्या विक्रमी ध्वजारोहणाला शक्ती प्रदर्शन म्हटले जात आहे.
- या आधी लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला होता.
- हा झेंडा २२५ फुट लांबीचा होता.
- लेह गैरीसन मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन देखील फायर अँड फ्यूरी कोर ने केले होते.
- जिथे उंच डोंगरावर उपराज्यपाल आरके माथुर यांनी उंच ध्वज फडकवला.
- सैन्य प्रमुख एमएम नरवणे आणि उत्तर कमान कॅप्टन लेफ्टनंट जनरल वायके जोशी पण या कार्यक्रमात उपस्थित होते.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हा तिरंगा फडकवल्याचे भारतीय सैन्याने सांगितले.