मुक्तपीठ टीम
अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं नवं स्पप्न आहे अकासा एअरलाइन्सचं. या नव्या विमान कंपनीने ७२ बोईंग ७३७ मॅक्स जेटची ऑर्डर दिली आहे. लो बजेट कॅरिअर असणाऱ्या अकासा एअरलाइन्सने अमेरिकन विमान निर्माता कंपनी बोईंगकडे मागणी नोंदवली आहे. अकासा एअरलाइन्सच्या ऑर्डरमध्ये ७३२ मॅक्स ग्रुपमधील दोन प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये अधिक क्षमतेच्या ७३७-८ आणि त्याहून जास्त क्षमता असलेले ७३७-८-२०० या व्हेरिएंट्सचा समावेश आहे.
शेअरबाजारासारखेच झुनझुनवालांचा आकाशातही तळपण्याचं लक्ष्य
- राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरलाइन्सची ही मोठी ऑर्डर आहे.
- बोईंगला अमेरिकन विमान निर्मात्याला जगातील सर्वात उत्तम बाजारपेठांमध्ये पुन्हा प्रवेश करण्यास मदत करू शकते.
- अकासाची पहिली विमान ऑर्डर बोईंगकडे नोंदवली गेली आहे.
- अकासा एअरच्या बिझनेस प्लॅन आणि लीडरशिप टीमवर त्यांनी विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
पुढील वर्षी उड्डाण सुरू करण्याची योजना
- भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान बाजारपेठांपैकी एक आहे आणि त्यात प्रचंड क्षमता आहे.
- आम्ही आधीच विमान प्रवासात मजबूत पुनर्प्राप्ती पाहत आहोत.
- अकासा एअरची मालकी असलेल्या एसएनव्ही एव्हिएशनची वेगानं तयारी सुरु आहे.
- देशातील नवीन अल्ट्रा-लो-कॉस्ट कॅरियर लाँच करण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाकडून आवश्यक प्रारंभिक मंजुरी मिळाल्यानंतर ते पुढील वर्षी उड्डाण सुरू करण्याची शक्यता आहे.