मुक्तपीठ टीम
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासराव हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नी स्नेहाचे आरोप
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने१० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी
- नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
- तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला.
- या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असं जमलं स्नेहा आणि विश्वासचं टुनिंग
- २०१८ मध्ये अभिनेता अनिकेत विश्वासराव अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत विवाहबद्ध झाला.
- स्नेहा चव्हाणने सोनी मराठीवरील महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
- याशिवाय ती हृदयात वाजे समथिंग या मालिकेतही भूमिका करत होती.
- स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या ‘लाल इश्क’ या चित्रपटात भूमिका केली होती.
- अनिकेत आणि स्नेहा चव्हाण ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात एकत्र झळकले होते.
- स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत.
- या ओळखीतून हे दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
- स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं आहे.
- विशेष म्हणजे दोघांचं ‘अरेंज मॅरेज’ आहे.
- फारसा गाजावाजा न करता पुण्याध्ये अनिकेत-स्नेहाचा विवाहसोहळा पार पडला होता.
- यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि मनोरंजन विश्वातील काही कलाकार उपस्थित होते.
हेही वाचा:
कौटुंबिक हिंसाचार कायदा नेमका कोणासाठी, कधी, कसा वापरता येतो?
कौटुंबिक हिंसाचार कायदा नेमका कोणासाठी, कधी, कसा वापरता येतो?