मुक्तपीठ टीम
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारपासून नागपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून ते स्वत: आमरण उपोषण करणार आहे. ते नागपूरच्या संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.
प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार
- मराठवाडा, विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी
- विदर्भाप्रमाणाचे मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन शेतकरी आहेत.
- खर्चाच्या तुलनेमध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
- शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी १८ नोव्हेंबरला स्वाभिमानींच्या वतीने मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
- तसेच याच दिवशी धरणे आणि ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
- कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
- आपल्या मागणीसाठी तुपकर हे मंळवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
…तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे तुपकरांचे आवाहन
- त्यानंतर १९ नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे.
- जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही.
- शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.
- आमचा हा लढा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून, जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
तुपकर यांना पोलिसांचे पत्र
- दरम्यान त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथील हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटल्याचे पहायला मिळाले होते.
- अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता, जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती.
- या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी करण्यात आली आहे.
- संचारबंदी असल्याने तुपकर यांनी आंदोलन कुरू नये असे पोलिसांनी म्हटले आहे.
- आंदोलनासंदर्भांत पोलिसांनी तुपकर यांना एक पत्र देखील पाठवले आहे.
- ज्यामध्ये संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका असे म्हटले आहे.