रोहिणी ठोंबरे
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे क्रिकेटपटू मायदेशी परतले. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने चौकशी केली असता, त्याच्याकडून ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे सापडली. हार्दिक पंड्याला या घड्याळ्यांबाबत विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पंड्याने याबद्दल स्पष्टीकरण देताना त्याने स्वत:च त्या घडाळ्यांची माहिती सीमाशुल्क विभागाला दिल्याचे सांगितले.
हार्दिक पंड्याकडे या घड्याळांचे बिलही नव्हते. यानंतर कस्टम विभागाने हार्दिककडून घड्याळे घेतली. त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२० मध्ये हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याकडून लक्झरी घड्याळे सापडली होती. त्यानंतर त्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी रोखले. त्यानंतर हे प्रकरण सीमाशुल्क विभागाकडे सोपवण्यात आले होते.
हार्दिक पंड्याने मुंबई विमानतळावरील घड्याळ जप्त केल्याच्या वादावर स्पष्टीकरण देत ट्विट केले की
- जेव्हा तो दुबईहून परत येत होता, तेव्हा त्याने स्वत: जाऊन आपले घड्याळ कस्टम अधिकाऱ्यांना दिले होते.
- हार्दिकने इतर सर्व आरोप फेटाळून लावले असून आवश्यक कागदपत्रे सीमाशुल्क अधिकार्यांना दिल्याचे सांगितले आहे.
- त्याचवेळी, सोशल मीडियावर दावा केल्यानुसार घड्याळाची किंमत ५ कोटी रुपये नसून १.५ कोटी रुपये असल्याचे त्याने स्पष्ट केले.
- मी दुबईतून येताना काही वस्तू खरेदी केल्या होत्या. मुंबईत आल्यावर या वस्तूंबाबत मी स्वतः कस्टम अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि सीमाशुल्क भरण्यास तयार झालो.
- सीमाशुल्क विभागाने सर्व आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत, जी आम्ही देत आहोत.
- सीमाशुल्क विभाग सध्या शुल्क मोजत आहे, जे मी भरण्यास तयार आहे. तसेच घड्याळाची किंमत ५ कोटी नाही तर, १.५ कोटी आहे.
हार्दिक पंड्याने आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, “मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, मी सर्व सरकारी यंत्रणांचा आदर करतो. माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत, ते कागदपत्र सीमाशुल्क विभागाला देण्यास मी तयार आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे.” रात्री उशिरा मुंबई विमानतळावर हार्दिक पंड्याकडून ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त करण्यात आल्याची ही बातमी समोर आली.
हार्दिक पंड्याच्या कोटी-कोटींच्या घड्याळांचं कलेक्शन
- पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११- किंमत ५ कोटींपेक्षा जास्त
View this post on Instagram
पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ या घड्याळाच्या डायल भोवती पाचूंनी एम्बेड केलेले आहे. हार्दिक पांड्या नेहमी त्याच्या स्टायलिश घड्याळ्यांच्या कलेक्शनसाठी ओळखला जातो.
- पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम १८ के व्हाईट गोल्ड- किंमत २.७ कोटी
View this post on Instagram
आयपीएल २०१९ दरम्यान पंड्या पहिल्यांदा पॅटेक फिलिप परिधान केलेला दिसला होता. या ब्रॅंडचे हे घड्याळ खास प्रसंगांसाठी आहे. डायलवर २५५ हिरे जडलेले आहेत आणि १८ के सोन्याच्या डायल प्लेटवर तीन बॅगेट-कट डायमंड मार्कर आहेत.
- पॅटेक फिलिप नॉटिलस ५७१२- किंमत १.६५ कोटी
View this post on Instagram
एका जबरदस्त फोटोशूटच्या वेळी त्याने हे घड्याळ परिधान केलेले दिसत आहे. या घड्याळाच्या मूळ डायलवर हिरे नाहीत परंतु, त्याच्या कस्टम अॅडिशनमुळे त्याचे मूल्य १.६५ कोटींपर्यंत वाढते.
- रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेटोना कॉस्मोग्राफ- १ कोटी
View this post on Instagram
रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेटोना कॉस्मोग्राफ १८ के पिवळ्या सोन्याच्या डायलवर तयार केले गेले आहे, ज्यामध्ये ३६ ट्रॅपीझ-कट हिरे आणि २४३ अतिरिक्त डायमंड जडलेले आहेत.
- ऑडेमार्स पिगेट रॉयल ओक सेल्फविंडिंग क्रोनोग्राफ रोझ गोल्ड – किंमत ३८ लाख
View this post on Instagram
ऑडेमार्स पिगेट या घड्याळात पिवळ्या सोन्याचे टोन्ड काउंटर आणि ल्युमिनेसेंट कोटिंगसह मार्कर आहेत. घड्याळाचा पट्टा १८ कॅरेट पिवळ्या सोन्याने बनलेले आहे ज्यात एपी फोल्डिंग क्लॅप आहे ज्याची किंमत जवळपास ३८ लाख आहे.