मुक्तपीठ टीम
मुंबईतील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळाचे प्रतिनिधी, एसटी कर्मचारी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप योग्य तोडगा निघू शकलेला नसल्याने गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं असल्याची टीका केली आहे. त्यातच अनिल परब यांनी संप मागे घ्या चर्चा करू असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे.
काळ्या पायाचं हे सरकार
- राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे.
- काळ्या पायाचं हे सरकार आहे.
- अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही.
- सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या.
- त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी.
- अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक
- परिवहन खात्याचे सचिव हे परदेशात जातातच कसे?
- गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात.
त्यांची चौकशी झाली पाहिजे. - ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार.
- तसंच परिवहन विभागाचे MD शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार.
- त्या पार्श्वभूमीवर उद्या प्रवीण दरेकर हे शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत.
- यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी असतील.
संप मागे घ्या, चर्चा करू अनिल परबांचे आवाहन
- एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न चर्चेशिवाय सुटणार नाही, हे मी वारंवार सांगितलं आहे.
- त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करु.
- उच्च न्यायालयाचा योग्य तो निर्णय येईल.
- येणारा निर्णय मान्य असेल.
- मी वारंवार सांगतो की संप मागे घ्या, चर्चा करु आणि प्रश्न सोडवू.
- भाजपनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे.
- आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करु.
- निदर्शन करणं हा प्रत्येकाचा अधिकारी आहे.
- मात्र, न्यायालयासमोर आत्मदहनाची धमकी देणं योग्य नाही.
- न्याय योग्य पद्धतीनं मागायला हवा.