मुक्तपीठ टीम
देशातील इंधनाच्या वाढत्या किंमतीवरुन आणि महागाईवरुन रविवारी काँग्रेसने मोर्चा काढला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.
पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते
- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले.
- पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत.
- केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही.
- केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते.
- त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही.
- असे असतानाही आपण केंद्र सरकारने आपला कर कमी केला.
- पण राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही.
- हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो.
- राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत.
एकाही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू
- औरंगाबाद शहरात गुंठेवारी प्रकरणी मनपाकडून विविध मालमत्ता नियमितीकरणाचे काम सुरू आहे, त्यावर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले, महापालिका प्रशासकांकडून धमकावण्याचे काम सुरु आहे.
- मात्र पालकमंत्री आले आणि त्यांनी स्थगिती दिली.
- एकिकडे लोकांना धाक दाखवायचा आणि दुसरीकडे स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे दाखवायचे, तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा.
- भाजप एकही झोपडी पडू देणार नाही.
- शिवसेनेने गुंठेवारी असो की झोपडपट्टी असो.
- एकाही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू.