मुक्तपीठ टीम
आयआरसीटीसी ही पर्यटनाच्याबाबतीत नेहमीच अग्रेसर असते. आयआरसीटीसी नेहमीच भन्नाट टूर प्लान सादर करते. आता हिवाळा असल्याने हा पर्यटकांच्या फिरण्याचा आणि पर्यटनांचा सुंदर काळ. अशा परिस्थितीत अनेकजण बाहेर जाण्याचा बेत आखतात. हिवाळ्याच्या मोसमात बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक लोक थंड हवेच्या ठिकाणांवर जातात. पण, हिवाळ्याच्या दृष्टीने अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे आपण फिरायला जाऊ शकतो. यापैकी एक ठिकाण म्हणजे भारताच्या दक्षिणेला असलेली राज्ये.
या हिवाळ्यात तुम्ही कर्नाटकातील म्हैसूर, उटी आणि कुन्नूरला फिरायला जाऊ शकता. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेली ही तिन्ही ठिकाणे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. कर्नाटकातील या तीन ठिकाणांना भेट देण्याची योजना आखत असलेल्या पर्यटकांसाठी आयआरसीटीसी एक अतिशय आलिशान हवाई टूर पॅकेज देत आहे. आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला साऊर्थन सोजर्न- म्हैसूर उटी अॅंड कुन्नूर (SOUTHERN SOJOURN – MYSORE OOTY & COONOR) असे नाव दिले आहे.
दक्षिणेकडील पर्यटनासाठी हवाईटूर पॅकेजचे आयोजन
- कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून या प्रवासाला सुरुवात होणार आहे.
- कोलकाता येथून पर्यटक बेंगळुरूला जातील. बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी रस्त्याने म्हैसूरला रवाना होतील.
- म्हैसूरला पोहोचल्यावर प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबवले जाईल, जेथे पर्यटक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचा आनंद घेतील.
- दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून प्रवासी म्हैसूर पॅलेसला भेट देतील, त्यानंतर दुपारचे जेवण करून प्रवासी वृंदावन गार्डन आणि नंदी मंदिराला भेट देतील.
- यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये परततील आणि रात्रीची विश्रांती घेतील.
- दुसऱ्या दिवशी पर्यटक मुदुमलाईच्या जंगलातून उटीला रवाना होतील.
- हे ठिकाण निलगिरीच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेले आहे.
- जगप्रसिद्ध कुरुंजी फूलही उटीमध्येच पाहायला मिळते. या फुलाची खास गोष्ट म्हणजे कुरुंजी फुल १२ वर्षातून एकदाच फुलते.
- उटीला भेट दिल्यानंतर, पर्यटक हॉटेलमध्ये परततील आणि येथे रात्री विश्रांती घेतील.
- न्याहारीनंतर दुसऱ्या दिवशी पर्यटक बोटॅनिकल गार्डन आणि उटी लेकला भेट देतील.
- दुपारच्या जेवणानंतर प्रवासी कुन्नूरच्या प्रवासासाठी रवाना होतील.
- कुन्नूर हे सुंदर दृश्य आणि चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. कुन्नूरला भेट दिल्यानंतर प्रवासी हॉटेल उटीला परततील.
- उटीमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर, पर्यटक दुसऱ्या दिवशी नाश्ता करतील आणि बंगळुरू विमानतळावरून कोलकात्याला परततील.
- आयआरसीटीसीच्या चार रात्री आणि ५ दिवसांच्या या हवाई टूर पॅकेजसाठी तुम्हाला २५,४६० रुपये खर्च करावे लागतील.