मुक्तपीठ टीम
‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धापरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या संपूर्ण कोरोनाकाळात गेले वर्षभर स्पर्धा परीक्षांसाठी जाहीराती निघाल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटली होती. त्यामुळे या उमेदवारांसाठी राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळाकडून एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय घेण्यात आला
- राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळांच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.
अशोक चव्हाण यांनी केली होती मागणी
- कोरोनाकाळात गेले वर्षभर नोकर- भरतीसाठी स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघाल्या नाहीत.
- त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटली होती.
- त्यामुळे किमान दोन वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी राज्यभरातून होत होती.
- या पार्श्वभूमीवर पुढील काळात नोकर- भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी; जेणेकरून त्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत के ली होती.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
- त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
- त्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- परीक्षार्थींसाठी एक वर्षाची मुदत शिथिल करण्याच्या निर्णयाबद्दल बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभार मानले.