मुक्तपीठ टीम
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत म्हणजेच दिल्लीच्या एम्समध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी २५२ जागा, मेडिकल सुपरिंटेंडेंट या पदासाठी १ जागा, असोसिएट प्रोफेसर या पदासाठी १ जागा अशा एकूण २५४ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) एमएस/ एमडी/ पीएच.डी/ एम.सीएच/ एमबीबीएस २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) एमडी/ एमएस किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी २) १४ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) नर्सिंग पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १२०० रूपये आकारले जाणार, आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी एम्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.aiims.edu/en.html वरून माहिती मिळवू शकता.