मुक्तपीठ टीम
सर्च म्हटलं की गुगल हा अंतिम शब्द तसाच आता संगणक क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थीनींसाठी करिअर सर्चही गुगलकडेच पूर्ण होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली गूगल विद्यार्थिनींना संगणक क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम संधी देत आहे. यासाठी गुगलने कॉम्प्युटर सायन्समध्ये शिष्यवृत्ती दिली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या सर्व महिलांना २०२२-२३ मध्ये ७४ लाख रुपयांची ची शिष्यवृत्ती मिळेल.
पात्रता
- उमेदवार हा २०२१-२०२२ मध्ये आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विद्यार्थी असावा.
- आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असावी.
- ती संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी संबंधित अभ्यासक्रम करत असावी.
- तिचा शैक्षणिक रेकॉर्ड असावा.
- विद्यार्थीनीने सर्व माहितीसह त्यांचा सीव्ही सबमिट करावा.
- यासोबतच संगणक विज्ञान क्षेत्रात काय सुधारणा करण्याची गरज आहे यावर ४०० शब्दांचा लेख लिहावा लागणार आहे.
असा करावा अर्ज
- प्रत्येक उमेदवाराच्या नाविन्यपूर्णता, समानता, विविधता, समावेशन आणि शैक्षणिक कार्यप्रदर्शनाच्या वचनबद्धतेच्या आधारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.
- https://buildyourfuture.withgoogle.com/scholarships/generation-google-scholarship-apac/ वर क्लिक करा.
- त्यानंतर Apply Now निवडा.
- विनंती केलेली सर्व माहिती भरा.
- शेवटी सबमिट बटण दाबा.