मुक्तपीठ टीम
आपल्या देशातील सात बहिणी म्हणून ओळखली जाणारी ईशान्येतील सात राज्ये म्हणजे अतुलनीय सौंदर्याची लयलूटच. ही सर्व राज्य नैसर्गिक देखाव्यांनी आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाने नटलेली आहेत. इथली सातही राज्य पर्यटकांची नेहमीच आवडती ठिकाणं आहेत. याच सातमधील एक राज्य असणाऱ्या आसाम राज्यात जर तुम्ही गेलात तर एकदा जाणं कमीच वाटेल एवढी विविधता ठासून भरलेली आहे. या राज्याला भेट देण्याची संधी आता समोर आली आहे.
बिहू आणि नॉर्थ ईस्टमधील इतर अनेक संस्कृती जवळून जाणून घेण्यासाठी आसाम हे खूप चांगले ठिकाण आहे. हे भारतरत्न आणि महान संगीतकार भूपेन हजारिका यांचेही जन्मस्थान आहे. आसामला भेट देण्यासाठी IRCTC एक अतिशय आरामदायी हवाई टूर पॅकेजही देत आहे. IRCTC च्या या हवाई टूर पॅकेजची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यामध्ये तुम्हाला गुवाहाटी, आसाममधील काझीरंगा आणि मेघालयातील शिलाँगला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवायही बरंच काही आहे. ते जाणून घेण्यासाठी मुक्तपीठ डॉट कॉमवरील चांगल्या बातम्यांमध्ये ही संपूर्ण बातमी नक्की वाचा.
शिलाँगचे दर्शन
- आसाम पर्यटनाची सुरुवात पाटणा विमानतळावरून होणार आहे.
- पाटणा येथून पर्यटक गुवाहाटीला जातील.
- गुवाहाटीला पोहोचल्यावर प्रवाशांना शिलाँगला नेले जाईल.
- शिलाँगला जाताना प्रवासी उमियम तलावाला भेट देतील.
- शिलाँगला पोहोचल्यावर प्रवाशांना हॉटेलमध्ये नेले जाईल.
- हॉटेलमध्ये थोड्या विश्रांतीनंतर, प्रवासी वॉर्ड्स लेक आणि लेडी हैदरी पार्क सारख्या ठिकाणांना भेट देतील.
चेरापुंजीसह इतर ठिकाणी भेट
- दुसऱ्या दिवशी सकाळी, प्रवासी एलिफंटा फॉल्स, ड्वान सिएम व्ह्यू पॉइंट, नोह कालिकाई फॉल्स, मावसाई लेणी आणि सेव्हन सिस्टर फॉल्स सारख्या ठिकाणांसह चेरापुंजीला भेट देतील.
- हॉटेलमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी डौकी (बांगलादेश सीमा) आणि नंतर आशियातील सर्वात स्वच्छ गाव मावलिनॉन्ग येथे जातील.
काझीरंगात हत्ती सफारीसह भटकंती
- तिसऱ्या दिवशी प्रवासी काझीरंगासाठी रवाना होतील. काझीरंगा येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर, प्रवासी सकाळी स्वखर्चाने हत्ती सफारीचा आणि जीप सफारीचा आनंद घेऊ शकतात.
- चौथ्या दिवशी प्रवासी कामाख्या मंदिर, नवग्रह मंदिर, उमानंद मंदिर आणि श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र या ठिकाणांना भेट देतील.
- संध्याकाळी, पर्यटक ब्रह्मपुत्रा नदीवर क्रूझ सफारीचा आनंद घेऊ शकतात.
- गुवाहाटीमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर प्रवासी पाटण्याला जातील.
IRCTC च्या या ६ रात्र आणि ७ दिवसांच्या टूर पॅकेजसाठी २९ हजार ८५० रुपये खर्च आहे.