मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे सध्या चर्चेत आहेत. एनसीबी ड्रग्स प्रकरणी आघाडीला अडचणीत आणू पाहणाऱ्या भाजपा नेत्यांवर, एनसीबी अधिकाऱ्यांना ते उघडे पाडत आहेत. मात्र, त्यांनी रविवारी केलेल्या गौप्यस्फोटांमधील माहिती वापरत आघाडीलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपा नेते मोहित कंबोज उर्फ भारतीय यांनी केला आहे.
ड्रग्स प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले फॅशन टीव्हीचे काशिफ खान कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना वारंवार क्रुझ पार्टीला बोलवून टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्याचा संदर्भ देत कॅबिनेट मंत्री अस्लम शेख आणि काशिफ खानचे काय संबंध आहेत हे लोकांसमोर उघडकीस आले पाहिजेत, असे कंबोज म्हणाले. तसेच, अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांचे थेट आरोप
- अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे.
- मी फक्त कोणता मंत्री यात सामील आहे असा प्रश्न विचारला होता? मी कुणाचंही नाव घेतलं नाही. मलिक यांनीच नाव घेतले, असे कंबोज म्हणाले.
कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना काशिफ खानकडून वारंवार पार्टीचे आमंत्रण कसे?
- ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, परंतु ओळख नसेल तर वारंवार कसे बोलावेल?
- एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो?
- अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजे. नवाब मलिकांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
- अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले.
- नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे नवे गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे.
राजकारण्यांच्या मुलांशी काशिफचे संबंध कसे?- मोहित कंबोज
- अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना काशिफ खानने पार्टीत येण्याचे आमंत्रण दिले होते.
- काशिफ खानचे आणि या नेत्यांच्या मुलांचे काय संबंध आहेत? या मुलांसोबत काशिफची कुठे बैठक झाली का? याचीही चौकशी झाली पाहिजे.
- मलिक यांनी ही माहिती उघड केल्यामुळे आता लवकरच सर्व प्रकरण बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
- राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत याची माहिती मलिक यांना द्यावी लागेल. कारण मलिक यांची ही जबाबदारी आहे.