हेरंबकुलकर्णी
आपल्या धार्मिक परंपरेत विधवा महिलांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. कोरोनातील विधवा महिलांसाठी काम करताना या परंपरेला धक्का देण्याचे काम आमच्या नाशिक जिल्हा समन्वयक नलिनी सोनवणे यांनी आज केले. लक्ष्मीपूजन व विविध धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना सहभागी केले जात नाही त्यामुळे त्यांनी लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा करण्याऐवजी या महिलांनाच लक्ष्मी समजून त्यांचे पूजन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला.
ही गोष्ट अगदी साधी वाटली तरी तथाकथित धार्मिक समजुतींना धक्का देणारी आहे. त्यांनी या पाच विधवा महिलांना घरी बोलावून त्यांना पाटावर बसून त्यांची विधीवत पूजा केली व त्यांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान केला यामधून या महिलांना खूप खूप बरे वाटले मन भरून आले. नवरात्रात अनेक ठिकाणी कुमारिकांचे सवाष्णीची पूजा केली जाते.. यातून विधवा महिलांमध्ये अधिकच न्यूनगंड वाढतो.. ज्या प्रमाणात या धार्मिक अस्पृश्यतेचे प्रमाण कमी होत जाईल. त्यातून या महिलांना त्यांच्या दुःखाची बोचणी अधिक कमी कमी होत जाईल. त्यामुळे नलिनी सोनवणे यांनी केलेला आजचा हा कार्यक्रम नक्कीच दिशादर्शक आहे आणि महत्त्वाचा आहे ..
कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र राज्य एकल महिला पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या कल्पना वापरून हा विषय समाजाच्या ऐरणीवर आणत आहेत
(नलिनी सोनवणे नाशिक फोन न 8805089085)